महिलांना आता मिळणार मोफत शिलाई मशीन : असा करा अर्ज…! Silai Machine Yojana 2024

gokulkumbhar.com
5 Min Read

Silai Machine Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, Silai Machine Yojana Maharashtra ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना घरी बसून स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी राबवण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन मोफत पुरवण्यात येते. ज्यामुळे त्या परिसरातील लोकांचे कपडे शिवून पैसे कमवू शकतील आणि स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

Silai Machine Yojana 2024 :

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत देशातील सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाईल ज्याद्वारे त्यांना घरी बसून सहज रोजगार मिळू शकेल. देशातील सर्व गरीब कामगार महिला मोफत सिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे इत्यादी योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Silai Machine Yojana 2024

मोफत शिलाई मशीन योजना 2024

लाभार्थी महिला शिलाई मशीनच्या सहाय्याने घरी बसून परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमवू शकतील. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल. राज्यातील 5 हजारांपेक्षा जास्त गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा राज्य शासनाचा हेतू आहे.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असल्यामुळे महिलांना दैनंदिन गरजांसाठी पैशासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. रोजगाराच्या स्थायी संधी उपलब्ध नसल्यामुळे महिलांना रोजगार मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि कुटुंबाची गरज पूर्ण करणे शक्य होत नाही.

शिलाई मशीनची किंमत जास्त असल्यामुळे त्या खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते. 

मोफत शिलाई मशीन योजना 2024 : ठळक मुद्दे

मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट : free silai machine yojana 2024

  • महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळवून देणे.
  • महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • महिलांचे सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • महिलांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांचे जीवनस्तर सुधारणे.
  • महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज न पडणे.
  • महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी कर्ज घेण्याची गरज न पडणे.
  • गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • महिलांचे भविष्य उज्ज्वल बनवणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
  • बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • राज्याचा आर्थिक विकासाला चालना देणे.
  • महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

ओबीसी विद्यार्थ्यांना आता मिळणार प्रति वर्ष 60 हजार रुपये : असा करा अर्ज | OBC Scholarship 2024👉 येथे क्लिक करा

pm silai machine yojana 2024 : लाभार्थी

  • महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू महिला.
  • राज्यातील 50 हजारांपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्याचे लक्ष्य.

free silai machine yojana 2024 : फायदे

  • गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी कर्ज घेण्याची गरज नाही.
  • महिलांना स्वतःचा रोजगार सुरु करून आर्थिक उत्पन्न वाढवता येईलकुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत.
  • महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत.

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता : pradhan mantri silai machine yojana 2024

  • इच्छुक महिलेचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र.

महाराष्ट्र शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत : silai machine yojana 2024 Online apply

  1. शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  4. अर्ज फॉर्म जमा करा.
  5. अर्ज स्वीकारले जाण्यावर, तुम्हाला शिलाई मशीन मिळेल.

महाराष्ट्र शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत : silai machine yojana 2024 Ofline apply

  1. तुम्हाला संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय यांमध्ये जा.
  2. शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज फॉर्म मिळवा.
  3. अर्ज फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
  4. अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करा.
  5. अर्ज स्वीकारले जाण्यावर, तुम्हाला शिलाई मशीन मिळेल.

मोफत शिलाई मशीन योजना 2024 अर्ज रद्द होण्याची कारणे

खालील दिलेल्या कारणामुळे अर्ज रद्द होऊ शकतो

  1. अर्जदार महिलेने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.
  2. अर्जदार महिलेकडे शिवण यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  3. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  4. अर्जदार महिला गरीब कुटुंबातील नसल्यास तसेच महिलेच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  5. अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  6. अर्जात चुकीची माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केली जाईल.

अधिकृत वेबसाईट: 👉 येथे क्लिक करा

धन्यवाद ! 🙏

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *