डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना : नोंदणी सुरु | Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024

gokulkumbhar.com
10 Min Read

Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो,आजच्या या लेखामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.मित्रांनो आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेविषयी संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

Contents
Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024 : ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुदानDr Babasaheb Swavalamban Yojana चे उद्देशडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे वैशिष्ट्येडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी पात्रताडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रेजुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीताशेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीताDr Babasaheb Krushi Swavalamban Yojana अंतर्गत अर्ज करण्याची पद्धतअधिकृत वेबसाईट:👉 येथे क्लिक कराDr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्नBabasaheb Ambedkar Yojana चा उद्देश काय आहे?डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि अंतर्गत किती अनुदान देण्यात येते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती/नवबोध्द शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवन व मान उंचावण्यासाठी अशा योजना शेतक-यांना शेतीसाठी राबवल्या जातात.

योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतात नवीन विविध बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्तीसाठी, इनवेल बोअरिंगसाठी, पंप संच बसविण्यासाठी, वीज जोडणी करण्यासाठी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी तसेच सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देण्यात येते.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा, जेणेकरून या योजनेचा लाभ मिळविण्यापूर्वी योजनेबद्दल संपूर्ण प्राथमिक माहिती आपणास आत्मसात होईल.

Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024

Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024

राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक तसेच प्रमुख व्यवसाय आहे व शेती पिकांसाठी पाण्याची आवश्यकता हि महत्वाची असते परंतु अनिश्चित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही व त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ज्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसतो त्यामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी असतो आणि त्यात शेती पिकाचे पाण्याअभावी होणारे सततचे नुकसान यामुळे तो आत्महत्या करतो व काही शेतकरी हे शेती क्षेत्राकडे पाठ फिरवतो त्यामुळे राज्यात जर अशीच परिस्थिती राहिली तसे शेती क्षेत्राला मोठा धोका निर्माण होईल व राज्यात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करू राज्य शासनाने राज्यात Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना क्षेत्री क्षेत्राशी निगडित कार्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे आहे.

Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024 : ठळक मुद्दे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुदान

dr babasaheb ambedkar swavalamban yojana जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

  • या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख) अनुदान मिळणारआहे.
  • जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार) अनुदान मिळणार आहे.
  • इनवेल बोअरींग (रु.20 हजार) अनुदान मिळणार आहे.
  • पंप संच (रु.20 हजार) अनुदान मिळणार आहे.
  • वीज जोडणी आकार (रु.10 हजार) अनुदान मिळणार आहे.
  • शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) अनुदान मिळणारआहे.
  • सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार) अनुदान मिळणार आहे.
  • पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/) अनुदान मिळणार आहे.

टीप – सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024

बांधकाम कामगारांना मिळणार ५००० रुपये आणि गृहपयोगी वस्तूंचा संच | Bandhkam Kamgar Yojana 2024👉 येथे क्लिक करा

Dr Babasaheb Swavalamban Yojana चे उद्देश

  • अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचा आर्थिक विकास करणे व त्यांचे जीवनमान उंचाविणे.
  • पाण्याअभावी शेत पिकाचे होणारे नुकसान टाळणे.
  • शेतकऱ्यांना शेत पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे.
  • शेती क्षेत्राचा विकास करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे.
  • योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविणे.
  • जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे
  • राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • शेतकऱ्यांना शेती कार्यात आवश्यक बाबींसाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.
  • शेतीची उत्पादकता वाढविणे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे वैशिष्ट्ये

  • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • त्यामुळे त्याचा वेळ आणि प्रवासासाठी लागणारा पैसे दोघांची बचत होईल.
  • Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana अंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होईल त्यामुळे त्यांच्या पिकाचे होणारे नुकसान टाळता येईल.
  • शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखल्या जातील.
  • शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
  • शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
  • स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनांतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतक-यांनाया योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
  • ज्या शेतक-यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,५०,०००/- चे मर्यादेत आहे अशा शेतकयांनी संबंधीत तहसिलदार यांचेकडून सन 2024-25 चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहिल.

व्यवसायासाठी मिळवा ₹ ५०,००० पर्यंत कर्ज, असा करा अर्ज | PM Svanidhi Yojana 2024👉 येथे क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर मिळविणेबाबत :

  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • 7/12 व 8-अ चा उतारा
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
  • ग्रामसभेचा ठराव.

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता

  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
  • ग्रामसभेचा ठराव. dr babasaheb ambedkar swavalamban yojana
  • जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
  • तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
  • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
  • इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता

  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
  • जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
  • तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
  • ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
  • शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
  • विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
  • प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.

Dr Babasaheb Krushi Swavalamban Yojana अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर New Registration वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर New Registration Form उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
  • Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana अशा प्रकारे अर्जदाराची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
  • आता अर्जदाराला त्याचा Username आणि Password टाकून लॉगिन करायचं आहे.
  • Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojanahome page
  • लॉगिन केल्यावर अर्जदारासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये अर्ज करा वर क्लिक करायचे आहे.
  • Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana form
  • आता बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये अर्जदाराची संपूर्ण माहिती भरावयाची आहे व सोबत आवश्यक दस्तावेज अपलोड करायचे आहेत.व अर्जदाराला २४ रुपयाचे नोंदणी शुल्क भरायचे आहे.
  • Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana application form
  • Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana upload documents
  • Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana oline fees
  • अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्ग ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिकृत वेबसाईट:👉 येथे क्लिक करा

धन्यवाद ! 🙏

Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Babasaheb Ambedkar Yojana चा उद्देश काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती क्षेत्रात आवश्यक घटकांसाठी आर्थिक अनुदान देणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि अंतर्गत किती अनुदान देण्यात येते?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2.5 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *