Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana : नमस्कार मित्रांनो, MARATHI ZONE मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने हि अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.
Mahatma Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा प्रदात्यांच्या नेटवर्कद्वारे ओळखल्या जाणार्या आजारांसाठी रोखरहित सेवा पुरवते.
ही योजना महाराष्ट्र शासनाची एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते तसेच गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी 3 लाख रुपये विमा संरक्षण दिले जात होते परंतु मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mahatma Phule Jan Arogya Yojana चे आधीचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असे होते जी 2 जुलै 2012 पासून 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती आणि नंतर 21 नोव्हेंबर 2013 पासून ती महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली आता हि योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविणे हा आहे.
Mahatma Phule Jan Arogya Yojana : नवीन अपडेट
पूर्वी या योजनेअंतर्गत नागरिकांना 3 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जात होते व या योजनेचा लाभ फक्त पिवळे रेशनकार्ड धारकांनाच दिला जायचा परंतु नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल व सर्व प्रकारच्या शिधापत्रक धारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
किडनीवरील शस्त्रक्रिया उपचाराचा खर्च पूर्वीच्या अडीच लाखांवरून साडेचार लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
अनावश्यक उपचारांना वगळण्यात आले आहे तर काही नव्याने सुचविलेल्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही योजनांमध्ये अधिकृत रुग्णालयांची संख्या 1000 होती मात्र ती आता 1350 करण्यात येणार असून या योजनेत सर्व शासकीय रुग्णालये स्वीकारण्यात आली आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 ठळक मुद्दे : Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
योजनेचे नाव | महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकार / राज्य शासन |
विभाग | आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन |
योजनेची सुरवात | 1 एप्रिल 2017 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
लाभ | आरोग्य सुविधा |
योजनेचा उद्देश | गरिबांना आरोग्य सुविधा प्रदान करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
महात्मा फुले जन आरोग्य योजना चा उद्देश : Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
1} Mahatma Jyotiba Phule Yojana अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविणे हा प्रमुख उद्देश आहे.
2} विविध शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन तसेच आवश्यक असलेल्या आपत्तीजनक आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.
3} राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे
4} राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
5} गंभीर आजारांवरील उपचारासाठी नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
6} गंभीर आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी नागरिकांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
7} नागरिकांना उत्तम आरोग्य उपलब्ध करून देणे.
महात्मा ज्योतिबा फुले योजना चे वैशिष्ट्य : Mahatma Phule Jan Arogya Yojana
- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि महत्वाची अशी एक योजना आहे.
- Mahatma Phule Arogya Yojana अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सहाय्य दिले जाते.
- या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.
- या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना रुग्णालयांमधील उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
- या योजनेअंतर्गत किडनी ट्रांसप्लांटेशन साठी 5 लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- या योजनेअंतर्गत प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, मोतिबिंदू, कॅन्सर ऑपरेशन सोबत ढोपरांचे प्रत्यारोपण, डेंग्यू स्वाइन फ्लू, मलेरिया पीडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल एनीमिया इत्यादी आजारावर उपचार केले जातात.
- या योजनेअंतर्गत नागरिकांना निशुल्क उपचार सुविधा दिली जाते.
- या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील नागरिकांना लाभ दिला जातो.
ज्योतिबा फुले योजना चे लाभार्थी पात्रता : mahatma jyotiba phule jan arogya yojana eligibility
- अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळे रेशन कार्ड धारक,अंत्योदय रेशन कार्ड धारक,अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी तसेच केशरी कार्डधारक कुटुंबे (वार्षिक उत्पन्न 1 लाखांपर्यंत) तसेच महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी जारी केलेली कुटुंबे. या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- शासकीय महिला आश्रमातील महिला.
- शासकीय अनाथ आश्रमातील मुले.
- शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक.
- माहिती व जनसंपर्क पत्रकार व त्यांची कुटुंबे.
- कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची मुले या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2011 च्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जन-गणनेतील (SECC 2011) ग्रामीण व शहरी भागांसाठी ठरवलेल्या निकषानुसार कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
- नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- ज्येष्ठ नागरिक
- अपंग नागरिक
- Freedom Fighter
- Ex-Service man
- Marine Fisher
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी: समाविष्ट कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जात जनगणना 2011 (SECC 2011) च्या स्वयंचलित समावेश, वंचितता आणि व्यावसायिक निकषांवर आधारित आहेत. राज्यात 83.72 लाख कुटुंबे आहेत. हा डेटा गोठवला आहे त्यामुळे अतिरिक्त कुटुंबे जोडली जाऊ शकत नाहीत. तथापि, विद्यमान कुटुंबांमध्ये नवीन सदस्य जोडले जाऊ शकतात.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
शहरी
शहरी भागासाठी 11 व्यावसायिक निकष ओळखले जातात रॅग पिकर्स, भिकारी, घरगुती कामगार, रस्त्यावर विक्रेते, मोची, फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर, गवंडी, पेंटर्स, वेल्डर, सफाई कामगार स्वच्छता कामगार, माळी, गृहस्थ कामगार, कारागीर, हस्तकला. कामगार, शिंपी, वाहतूक कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर, मदतनीस, रिक्षाचालक, दुकानातील कामगार, सहाय्यक, शिपाई, परिचर, वेटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, असेंबलर, दुरुस्ती कामगार, वॉशर-मेन, चौकीदार.
ग्रामीण
ग्रामीण भागासाठी ग्रामीण निकष D1 ते D7 पर्यंत आहेत ज्यात कच्च्या भिंत आणि कच्च्या छप्पर असलेली एकच खोली असलेली कुटुंबे, 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नाही, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंब, अपंग सदस्य आणि सक्षम शारीरिक प्रौढ सदस्य नाही, अनुसूचित जाती/जमाती कुटुंबे, भूमिहीन कुटुंबे ज्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अंगमेहनतीतून मिळतो. आपोआप समाविष्ट केलेल्या श्रेणीमध्ये निवारा नसलेली कुटुंबे, निराधार-भिक्षेवर जगणारी, हाताने सफाई कामगार कुटुंबे, आदिम आदिवासी गट आणि कायदेशीररित्या मुक्त झालेल्या बंधपत्रित कामगारांचा समावेश होतो.
महात्मा फुले जण आरोग्य योजना चे फायदे : mahatma jyotiba phule jan arogya yojana benefits
1} या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
2} या योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
3} लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.
4} ही योजना पूर्णपणे संगणकीकृत असून या योजने अंतर्गत समाविष्ट रुग्णालयातून लाभार्थ्यास सर्व शिधापत्रिकेच्या आधारे विमा संरक्षण दिले जाते.
5} आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांच्याजवळील 7/12 उतारा व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण केले जाते.
6} या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांमधून देण्यात येणारा उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठी आवश्यक औषधोपचार, भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जातो.
7} या योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयातून मुक्त केल्यावर 10 दिवसांपर्यंत च्या लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते.
8} या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
9} राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
10} राज्यातील नागरिक एखाद्या आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेला लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
11} गंभीर आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी आता नागरिकांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज देखील भासणार नाही.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी : mahatma jyotiba phule jan arogya yojana disease list
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील कुटंबातील लोकांना निशुल्क आणि चांगल्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात आणि या योजने अंतर्गत ९७१ आजारांवर निशुल्क उपचार केले जातात. या आजारांमध्ये नक्की कोण कोणते आजार आहेत ते आपण पाहूया.
क्रमांक | आजाराचे नाव | क्रमांक | आजाराचे नाव |
1 | हृदयरोग | 16 | प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग |
2 | नवजात आणि बालरोग वैद्यकीय | 17 | ENT शस्त्रक्रिया |
3 | हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया | 18 | भाजणे |
4 | बालरोग शस्त्रक्रिया | 19 | सामान्य शस्त्रक्रिया |
5 | कॅन्सर शस्त्रक्रिया | 20 | हाडांचे आजार |
6 | बालरोग कर्करोग | 21 | रक्तविज्ञान |
7 | फुफ्फुसे आजार | 22 | मुतखडा (किडनी स्टोन) |
8 | त्वचेसंबंधीचे आजार व शस्त्रक्रिया | 23 | प्लास्टिक सर्जरी |
9 | मूत्रपिंडाचे आजार | 24 | मानसिक विकार |
10 | संसर्गजन्य रोग | 25 | संधिवातशास्त्र |
11 | न्यूरोसर्जरी | 26 | नेत्ररोग |
12 | मूत्रविज्ञान (जननेंद्रियाची शस्त्रक्रिया) | 27 | न्यूरोलॉजी |
13 | जठरांत्रमार्गाचे रोग | 28 | सर्जिकल ऑन्कोलॉजी |
14 | ओरल आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया | 29 | इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी |
15 | कॅन्सर शस्त्रक्रिया | 30 | एंडोक्राइनोलॉजी (अंत:स्रावी ग्रंथी) |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना रुग्णालय यादी : mahatma jyotiba phule jan arogya yojana hospital list
- सर्व प्रथम https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
- पोर्टलच्या होम पेजवरून मेनू बारवर जा आणि नेटवर्क हॉस्पिटल्स निवडा.
- स्क्रीनवर एक ड्रॉप-डाउन सूची उघडेल जिथून तुम्हाला “Districtwise And Speciality wise Hospital List” पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे.
- नवीन पृष्ठ उघडेल तिथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दिसतील, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- नवीन पृष्ठ उघडेल तिथे तुमच्या जिल्यातील नोंदणीकृत पत्ता आणि फोन नंबर सह हॉस्पिटलची यादी दिसेल.
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची यादी : 👉येथे क्लिक करा
mahatma jyotiba phule jan arogya yojana card download : महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ घायचा असेल तर सर्व प्रथम या योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या रुग्णालयाची यादी पाहून आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या सर्व रुग्णालयामध्ये या योजनेचे प्रतिनिधी, आरोग्यमित्र असतात जे तुम्हाला हेल्थ कार्ड मिळवून देण्यास मदत करतात, बहुतांश रुग्णालयामध्ये या योजनेसाठी वेगळी विंडो (खिडकी) उपलब्ध करून दिली जाते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आवश्यक कागदपत्रे : mahatma jyotiba phule jan arogya yojana documents
- आधार कार्ड
- केशरी/ पिवळे शिधापत्रिका
- पॅन कार्ड
- ओळखपत्र
- मतदार आयडी कार्ड
- ड्रायव्हिंग लायन्स
- शाळा/कॉलेज आयडी
- पासपोर्ट
- स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
- RGJAY/MJPJAY चे हेल्थ कार्ड
- अपंग प्रमाणपत्र
- फोटोसह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड
- सैनिक मंडळाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
- सागरी मत्स्यपालन ओळखपत्र
- महाराष्ट्र सरकार/भारत सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना चे नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरीब कुटुंब ज्यांच्याजवळ पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशन कार्ड आहे असे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार नागरिकांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
Mahatma Jyoti Rao Phule Jan Arogya Yojana ची कार्यपद्धती
- ज्या व्यक्तीला एखादा आजार आहे त्याला एखाद्या शासकीय रुग्णालयात त्या रोगासंबंधी तपासणी करणे आवश्यक आहे.
- आधाराची तपासणी केल्यावर त्या आजाराचे निदान करण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा तपशील डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे.
- सदर खर्चाचा तपशील महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले जन योजनेअंतर्गत आरोग्य मित्रांच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करते वेळी भरला जातो.
- यामध्ये आजाराचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरचा खर्च, प्रवासभाडे, औषधे या सर्व खर्चाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर केली जाते.
- त्यानंतर आजारी व्यक्तीचा इलाज केला जातो.
- या योजनेअंतर्गत आजाराचे निदान मोफत केले जाते.
Mahatma Jyotiba Phule Arogya Yojana अंतर्गत दावा अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास
- अर्जदाराने शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा प्राप्त केल्यास
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज : mahatma jyotiba phule jan arogya yojana online application
पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया –
- सर्व प्रथम, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
- मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पृष्ठ दिसेल, त्यामध्ये तुम्हाला युजर आईडी पासवर्ड भरावा लागेल.
- त्यानंतर लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
- अश्या प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन होईल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी –
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
- यामध्ये आपल्याला स्वतःशी संबंधित सर्व माहिती तयार करावी लागेल आणि सर्व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
- यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- मित्रांनो सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत असाल आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार मिळू शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हेल्पलाइन क्रमांक : mahatma jyotiba phule jan arogya yojana helpline number
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने संबंधी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता
टोल फ्री क्रमांक :-
1} 155 388
2} 1800 233 2200
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
धन्यवाद ! 🙏
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न
महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा उद्देश काय आहे ?
महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील कुटंबातील लोकांना निशुल्क आणि चांगल्या वैद्यकीय सेवा मिळाव्या या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हि योजना लागू केली आहे.
MJPJAY योजनेच्या नोंदणीची प्रक्रिया ?
योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन आधार कार्ड, केशरी/ पिवळे शिधापत्रिका, पॅन कार्ड, फोटो असलेले ओळखपत्र इ. आवश्यक कागदपत्रासह अर्ज करून आपली नोंदणी करावी
महाराष्ट्र सरकारची मोफत आरोग्य विमा योजना काय आहे ?
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारची मोफत आरोग्य विमा योजना आहे, या योजनेअंतर्गत सरकारी तसेच खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा निशुल्क सेवा प्रधान केली जाते
महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णाला उपचारासाठी काही अतिरिक्त पैसे द्यावे लागतील का ?
नाही. मंजूर पॅकेज अंतर्गत समाविष्ट असलेल्या सेवांसाठी रुग्णाने हॉस्पिटल/केंद्राला कोणतेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत.