Mahila Samrudhi Karj Yojana 2024 | महिला समृध्दी कर्ज योजना 2024 : असा घ्या लाभ…!

gokulkumbhar.com
13 Min Read

Mahila Samrudhi Karj Yojana 2024 : महिला समृद्धी कर्ज योजना (Mahila bachat gat loan) ही योजना महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जात आहे.

Contents
Mahila Samrudhi Karj Yojana 2024 :महिला समृध्दी कर्ज योजना 2024 : ठळक मुद्देमहिला समृद्धी कर्ज योजनेचे स्वरूपमहिला समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश : Mahila Samruddhi Karj Yojana Purposeमहिला समृद्धी कर्ज योजनेची वैशिष्ट्ये : Mahila Samruddhi Karj Yojana Featuresमहिला समृद्धी कर्ज योजनेचे लाभार्थी : Mahila Samruddhi Karj Yojana Beneficiaryमहिला समृद्धी कर्ज योजनेची पात्रता : Mahila Samruddhi Karj Yojana Eligibilityमहिला समृद्धी कर्ज योजनेच्या अटी : Mahila Samruddhi Karj Yojana Terms & Conditionमहिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे : Mahila Samruddhi Karj Yojana Documentsमहिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे : Mahila Samruddhi Karj Yojana Rejectionमहिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत : Mahila Samruddhi Karj Yojana Registration ProcessMahila Samrudhi Karj Yojana 2024 FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्नQ 1. महिला बचत गट कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?Q 2. महिला बचत गट कर्ज योजना चे लाभार्थी कोण आहेत?Q 3. महिला बचत गट कर्ज योजनेचा फायदा काय आहे?Q 4. महिला बचत गट कर्ज योजनेचा उद्देश काय आहे?Q 5. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत व्याज दर किती आहे?Q 6. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी किती आहे?Q 7. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?

ही योजना महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. सध्या महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. महिलांनी पुढे जावे त्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरु करतील आणि स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील.

आता कित्येक महिला, बचत गटाच्या साह्याने आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढे आलेले आहेत. परंतु काही महिलानां या योजना माहीत नसतात त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

त्यामुळे आज आपण महिला समृध्दी कर्ज योजना ची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती, इत्यादी सर्व प्रश्नची उत्तरे आज तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हला हि या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेण्याचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Mahila Samrudhi Karj Yojana 2024 |

Mahila Samrudhi Karj Yojana 2024 :

महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य (समाज कल्याण) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायीकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते. महिला सक्षमीकरण लक्षात घेऊन ही योजना देशभरातील विविध चॅनेल पार्टनर राबवित आहेत. या योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना ओळखले जाते व त्यांना थेट किंवा बचत गट (एसएचजी) च्या स्वरूपात व्यवसाय कर्ज दिले जाते.

महिला समृध्दी कर्ज योजना 2024 : ठळक मुद्दे

महिला समृद्धी कर्ज योजनेचे स्वरूप

महिला समृद्धी कर्ज योजनेची(Mahila bachat gat loan) सुरुवात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.अल्पसंख्याक समाजातील महिलांना या योजनेसाठी उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या (Mahila bachat gat loan) योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4 टक्के आहे. तसेच योजनेची परतफेडीचा कालावधी हा तीन वर्षे आहे.या योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे हा आहे.

  • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
  • राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत बचत गटातील सभासदांना प्रत्येकी रुपये 25,000 हजार आहे.

महिला समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश : Mahila Samruddhi Karj Yojana Purpose

  • राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.
  • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
  • ज्या महिला बचत गटांनी, गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरु केला आहे, अशा व्यवसाय करत असलेल्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे व त्यांना सक्षम करण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील बचत गटातील गरीब,होतकरू,परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.
  • महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
  • राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील व राज्यातील इतर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • राज्यातील होतकरू व कष्टाळू महिलांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

E-Shram Card Pension Yojana 2024 | ई-श्रम कार्डधारकांना मिळणार ₹ 3000 मासिक पेन्शन : असा करा अर्ज…!👉येथे क्लिक करा

महिला समृद्धी कर्ज योजनेची वैशिष्ट्ये : Mahila Samruddhi Karj Yojana Features

  • महिला समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.
  • स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील पुष्कळ महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
  • बचत गटातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हि योजना महत्वपूर्ण ठरेल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे तसेच कमी कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्यात आलेली आहे.
  • महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • महिलांचा या योजनेअंतर्गत आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
  • महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त व्याज दराने कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी व्याज दरात म्हणजेच ४% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत प्राप्त कर्ज परतफेडीचा कालावधी ३ वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
  • महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

महिला समृद्धी कर्ज योजनेचे लाभार्थी : Mahila Samruddhi Karj Yojana Beneficiary

राज्यातील महिला बचत गटातील महिला या योजनेचे लाभार्थी आहेत

महिला समृद्धी कर्ज योजनेची पात्रता : Mahila Samruddhi Karj Yojana Eligibility

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी हा मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे,
  • बचत गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकांतील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • लाभार्थी बीपीएल(दारिद्र्य रेषेखालील) श्रेणीतील असावेत.
  • कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
  • महिला लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 50 वर्षांतील असावे.
  • कर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98 हजार तर, शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे 1 लाख 20000 रुपये पर्यंत असावे.
  • केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • बचतगट स्थापन होऊन किमान ०२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.

महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अटी : Mahila Samruddhi Karj Yojana Terms & Condition

  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील ५% रक्कम भरावी लागेल.
  • कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग ४ महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे.
  • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २० लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थी महिलेस स्वतःकडील भरावी लागेल.
  • या (Mahila bachat gat loan) योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ दिला जाईल.
  • अर्जदार महिला कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
  • अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ३ वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरून सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेवर दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
  • महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्थसहाय्य किमान ५,३,२ वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या महिला बचत गटास दिले जाईल
  • अर्थसहाय्य गट स्थापन करुन किमान ४ वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या व सामुदायिक व्यवसाय अथवा गटातील किमान ५०% सदस्या व्यवसाय करत असणा-या महिला बचत गटास मिळू शकेल.
  • महिला बचत गटांनी त्यांचे बचतीच्या संबंधात लेख्यांच्या नोंदी अद्यावत ठेवलेल्या असाव्यात.
  • महिला बचत गटांची मासिक बैठक नियमीत व बचतीसाठी जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणी नियमीत भरणा केलेली असावी. याबाबत ठरावाच्या नोंदीची छायाप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
  • या निधीचा उपयोग महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या उद्योगाच्या/व्यवसाच्या सक्षमीकरणाकरीता करण्यात यावे.
  • बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बैंक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक (गव्हर्नमेंट अंडरटेकींग) यामध्ये असेल त्या बचत गटांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अशा प्रकारचे अर्थसहाय्य एकदाच गटाला मिळू शकेल.
  • सदर योजनेचा(Mahila bachat gat loan) लाभ गटामार्फत सुरु असलेल्या व्यवसाय तसेच त्यांच्या बचतीच्या लेख्याची तपासणी केल्यानंतर पात्र ठरेलल्या महिला बचत गटास देण्यात येईल.
  • दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे : Mahila Samruddhi Karj Yojana Documents

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवाशी पुरावा
  4. जन्म प्रमाण पत्र
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. मोबाईल नंबर
  7. ई-मेल आयडी
  8. बँकेचा तपशील
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे : Mahila Samruddhi Karj Yojana Rejection

  • अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात चुकीची खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जात कुटुंबातील इतर कोणत्या सदस्याचा बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास दोन्ही अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येईल. अधिकार मा.आयुक्त यांना राहील.

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत : Mahila Samruddhi Karj Yojana Registration Process

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील.

  • अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.

धन्यवाद ! 🙏

Mahila Samrudhi Karj Yojana 2024 FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q 1. महिला बचत गट कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

Ans: महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

Q 2. महिला बचत गट कर्ज योजना चे लाभार्थी कोण आहेत?

Ans: महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटातील महिला या योजनेचे लाभार्थी आहेत.

Q 3. महिला बचत गट कर्ज योजनेचा फायदा काय आहे?

Ans: महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत महिला बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Q 4. महिला बचत गट कर्ज योजनेचा उद्देश काय आहे?

Ans: राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.

Q 5. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत व्याज दर किती आहे?

Ans: महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत ४% व्याज दर आकारला जातो.

Q 6. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी किती आहे?

Ans: महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्ग प्राप्त कर्जाची ३ वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.

Q 7. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?

Ans: महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *