Namo Shetkari Yojana 2nd Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर : 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1792 कोटी रुपये येणार

gokulkumbhar.com
6 Min Read
Namo Shetkari Yojana 2nd Installment

Namo Shetkari Yojana 2nd Installment : नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार? हे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सारखे येत आहे. तर याबद्दल आम्ही सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे. ती तुम्ही सविस्तर संपूर्ण वाचावी. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत जवळपास 1792 कोटी एवढा निधी राज्य शासनाद्वारे मंजूर झालेला आहे. नमो शेतकरी योजना ही PM किसान योजना सारखीच आहे. जी एका वर्षामध्ये 6000 हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वाटप करते. या योजनेपासून शेतकऱ्यांना शासनाकडून थोडा तरी फायदा व्हावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.

तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे? आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार नाही? याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे तर चला पाहूया

Namo Shetkari Yojana 2nd Installment

Namo Shetkari Yojana 2nd Installment :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्र सरकार चालवते. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असली तरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. या दोन योजनांद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सध्या वार्षिक 12 हजार रुपये मिळत आहेत.

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून जवळपास 1792 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याआधी नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्ता करिता 1720 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला होता. तेव्हा त्या योजनेमध्ये जवळपास 86 लाख शेतकरी पात्र होते. परंतु आता नमो शेतकरी योजनेतील दुसऱ्या हप्त्यांमध्ये जवळपास 90 लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्या बँक खात्यावरती 1792 कोटी एवढे पैसे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेवटपर्यंत वितरित करण्यात येतील. असे स्वतः राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटर वरती सांगितले आहे. त्यामुळे चिंता करण्याचा काही विषय नाही नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होऊन जाईल.

राज्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर श्री. मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली, यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे १३ लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : ठळक मुद्दे

कन्यादान योजना महाराष्ट्र 2024 : असा करा अर्ज…! | Mukhyamantri Kanyadan Yojana 2024👉 येथे क्लिक करा

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा 2,000/- रुपयांचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जारी करण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याची रक्कम 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली. महाराष्ट्र सरकारने दिवाळी भेट म्हणून 1720 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. नमो शेतकरी योजना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरीव उत्पन्न सहाय्य प्रदान करते. जेणेकरून शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीचा लाभ मिळून आर्थिक संकट कमी होईल.

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी जाहीर होईल?

नमो शेतकरी योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000/- रुपयांची आर्थिक मदत मिळेल. जे 4 महिन्यांच्या अंतराने 2,000/- रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिले जाते. या योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023  रोजी जारी करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, पुढील म्हणजेच 2,000/- रुपयांचा दुसरा हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने फेब्रुवारी 2024 मध्ये जारी केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो. लाभार्थी शेतकरी अधिकृत पोर्टलला भेट देऊन नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता तपासू शकतात.

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी (नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता) 1792 कोटी रुपयांचा विशेष आर्थिक निधी प्रदान करण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे.

त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येईल. त्याचप्रमाणे, पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता देखील 28 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे.

शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे पैसे एकाच दिवशी मिळतील, असा दावा माध्यमांनी केला आहे. सरकारकडून या वृत्ताला कोठेही दुजोरा मिळालेला नाही आणि अधिकृत घोषणाही झालेली नाही.

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या पेमेंटची स्थिती खालील पद्धतीने तपासा :

  • नमो शेतकरी योजनेची पेमेंट स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
  • मुख्यपृष्ठावर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • आता तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबर या पेजवर टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि स्टेटस पाहण्यासाठी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही क्लिक करताच तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या समोर येईल.
  • अशा प्रकारे तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता. माहिती योग्य असल्यास, तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ दिला जाईल.

अधिकृत वेबसाईट: 👉 येथे क्लिक करा

धन्यवाद ! 🙏

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *