रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : अशा पद्धतीने करा अर्ज..!| New Ration Card Apply Online 2024

gokulkumbhar.com
7 Min Read

New Ration Card Apply 2024 : नमस्कार मित्रांनो,आजच्या या लेखामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.मित्रांनो आज आपण नवीन रेशन कार्ड कसे काढता येईल याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

रेशन कार्ड हे भारतातील अनेक कुटुंबांसाठी जीवनरेखा म्हणून काम करते, ज्यामुळे सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंचा प्रवेश सुनिश्चित होतो. खाद्यतेल,साखर,गहू,तांदूळ व इतर आवश्यक धान्याच्या खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते.

आज आपण या लेखात नवीन रेशन कार्ड ऑनलाइन कसे काढावे, त्यासाठी अर्ज कसा करावा, रेशन कार्ड चे फायदे आणि रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबद्दल ची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

New Ration Card Apply 2024 : हि सुविधा मिळणार घरबसल्या

राज्य शासनाने नवीन प्रणाली आणण्याचे ठरवले आहे या अंतर्गत खालील गोष्टी अगदी घरबसल्या करता येणार आहेत.

  1. नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करणे
  2. नावामध्ये काही चूक असल्यास दुरुस्ती करणे
  3. पत्ता बदलणे
  4. नवीन नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे

राज्य सरकारद्वारे या सर्व सुविधा आपल्यासाठी उभे करण्यात आली आहे. इ-रेशन कार्ड वितरित करण्यासाठी आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिले होते. त्याच अंतर्गत ही नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : Online Ration card चे स्वरूप

आपण जुन्या पद्धतीने वापरत असलेल्या रेशन कार्डवर ज्या पद्धतीची माहिती पाहायला मिळायची, अगदी त्याच पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्ड वर सुद्धा सर्व माहिती दिलेली असेल.सोबतच यावर क्यू आर (QR) कोड देखील असेल.

या क्यू आर (QR) कोड चा वापर ज्या ठिकाणी रेशन कार्ड वापरायचे आहे त्या ठिकाणी होईल. अशा संलग्न असलेल्या कार्यालयांमध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करता येईल.

जुन्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी रेशन कार्डचावापर व्हायचा तिथे आता हा क्यू आर कोड स्कॅन करता येईल.

New Ration Card Apply 2024 : Online Ration card चे फायदे

  • डीजी लॉकर या ॲप मध्ये हे ऑनलाईन रेशन कार्ड आपल्याला पाहायला मिळेल.
  • ऑनलाइन असल्यामुळे पीडीएफ किंवा फोटो या स्वरूपामध्ये मेल, मोबाईल फोन वर आपल्याला उपलब्ध होईल.
  • कोणत्याही वेळी ई-सेवा केंद्राला भेट देऊन कार्ड डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढता येईल.
  • जुन्या पद्धतीची रेशन कार्ड आता धान्य दुकानात घेऊन जाण्याची काही गरज नाही कारण तेथील कामकाज ई-पॉस मशीन चालत असते.

New Ration Card Apply Online

New Ration Card Apply Online 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना : नोंदणी सुरु | Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024👉 येथे क्लिक करा

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी कागदपत्रे : रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी online

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • लाईट बिल
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जॉब कार्ड
  • ड्रायविंग लायसन्स
  • अर्जदाराच्या नावावर चालू टेलिफोन बिल
  • अर्जदाराच्या नावावर एलपीजी(LPG)

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी online : रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अर्ज

  • सर्वात प्रथम आपणास शासनाच्या NFSE च्या वेबसाईट वर (https://rcms.mahafood.gov.in/) भेट द्यावि लागेल.
  • जर तुम्ही आधी कधी रजिस्ट्रेशन केले नसेल तर सर्वात आधी registration प्रक्रिया पूर्ण करून घ्या, त्यासाठी.
  • उजव्या बाजूला sign in / register पर्याय दिसेल त्यावर जाऊन Public Login हा पर्याय निवडायचा आहे.
  • आता “New user, sign up here” हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे.
  • नंतर तुम्हाला “Register new ration car user” ची पॉपअप उघडेल, त्यातील “I want to apply for new ration card” या पर्यायाची निवड करावी.
  • आता फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची अचूक माहिती टाकून घ्यावी.जसे कि नाव मायबोली व इंग्रजी मध्ये, आधार क्रमांक, लिंग (जेंडर), मोबाईल नंबर, ई-मेल ऍड्रेस टाका.
  • लॉगिन आई-डी व पासवर्ड तयार करा आणि Get OTP वरती क्लिक करा.
  • तुमच्या मोबाइल नंबर वरती एक OTP येईल तो तिथे प्रविष्ट करा, नंतर लॉगिन आई-डी व पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन व नवीन रेशन कार्ड साठी Apply करा.
  • आता लॉगिन आई-डी व पासवर्ड टाकून लॉगिन करा, तिथे मुख्यपृष्ठावर “रेशन कार्ड सेवा” येईल.
  • “नवीन शिधापत्रिका” अर्ज निवडा आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.
  • आता तुम्हाला सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, आणि फॉर्म सबमिट करा.
  • यशस्वी सबमिशन केल्यावर तुम्हाला एक पोचपावती किंवा संदर्भ क्रमांक प्राप्त होईल. हा क्रमांक तुमच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  • अशाप्रकारे तुम्ही रेशन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी Ofline :

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज व वरील नमूद केलेली सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळील स्वस्त धान्य दुकान किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते कागदपत्रे जमा करावी लागतील.

New Ration Card Apply Online 2024

व्यवसायासाठी मिळवा ₹ ५०,००० पर्यंत कर्ज, असा करा अर्ज | PM Svanidhi Yojana 2024👉 येथे क्लिक करा

रेशन कार्डसाठी नवीन नाव नोंदणी करण्याची ऑनलाइन प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हास राज्याच्या अन्न पुरवठा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर Login करा, आणि होम पेजवर नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठी एक पर्याय दिसेल, यावर क्लिक करा.
  • इथे समोर नवा फॉर्म दिसेल त्यात कुटुंबातील ज्या व्यक्तीचं नवीन नाव जोडायचे आहे त्यांची माहिती भरा.
  • फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे आणि सॉफ्ट कॉपीही सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  • यामुळे याच पोर्टलवर तुम्ही आपला फॉर्म चेक करू शकता.
  • अर्ज आणि कागदपत्रे अधिकारी चेक करतील. योग्य माहिती असल्यास तुमचा अर्ज स्विकारला जाईल.
  • त्यानंतर पोस्ट द्वारे रेशन कार्ड तुमच्या घरी सदरं २ आठवड्यांनी येईल.

रेशन कार्डसाठी नवीन नाव नोंदणी करण्याची ऑफलाईन प्रक्रिया

  • सर्वात आधी आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जा.
  • इथे नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठी अर्ज भरावा लागेल.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरुन कागदपत्रांसह अर्ज जमा करा.
  • इथे काही अर्जसाठी फी देखील भरावी लागेल.
  • अर्ज जमा झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला एक रिसिप्ट देतील, या रिसिप्टद्वारे तुम्ही अर्जाचं ऑनलाइन स्टेटस तपासू शकता.
  • अधिकारी फॉर्मची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
  • कमीत-कमी 2 आठवड्यात रेशन कार्ड घरी पाठवलं जाईल.

New Ration Card Apply Online 2024

अधिकृत वेबसाईट:👉 येथे क्लिक करा

धन्यवाद ! 🙏

New Ration Card Apply 2024 FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे?

रेशन कार्ड साठी नवीन अर्ज करायचा असल्यास सर्व प्रथम आपले सरकार या वेबसाईट वर भेट द्या. आणि या लेखात संपुर्ण माहिती दिल्याप्रमाणे अर्ज करा.

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय लागते?

अर्जासाठी ‘ही’ कागदपत्रे लागतात
– उत्पन्न दाखला
– रहिवासी दाखला (सातबारा उतारा, लाईट बिल)
– आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे)
– शेजारचे रेशनकार्ड झेरॉक्स स्वाक्षरी
– १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *