Pm Kisan Installment : नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये वितरित करण्यात आले. यामध्ये पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे 2000 रुपये तर नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये आणि तिसरे हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 6000 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
नमो शेतकरी व किसान सन्माननिधी या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला जमा झालेले नसतील तरी याबाबत काय करावे किंवा 16 वा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल किंवा नमो शेतकरी किसान निधी मधला दुसरा हप्ता मिळालेला नसेल याबाबत काय करावे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
Pm Kisan Installment
भारतातील नऊ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी याचा लाभ मिळालेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाची रक्कम थेट डीबीटी द्वारे पंतप्रधान यांच्या हस्ते यवतमाळ येथे कार्यक्रमात वितरित करण्यात आली. महाराष्ट्र मध्ये नमो शेतकरी निधी व पंतप्रधान किसान सन्मान निधी एकत्रित रित्या जमा करण्यात आला असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
भारतातील सर्व शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे गरजेचे केले होते त्यामुळे नऊ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नव्हती अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्याने की केवायसी केलेली आहे तरी पण याचा लाभ मिळालेले नाही त्यांनी पुढील प्रक्रिया करावी.
या शेतकऱ्यांना मिळाले नाही योजनेचा लाभ
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही.
शेतकऱ्यांना हप्त्यांची रक्कम कमी-जास्त का मिळाली ?
Pm Kisan Installment जाहीर करण्यात आलेल्या दोन्ही योजनांच्या हप्त्याचे पैसे राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँकेत 2000 तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये व काही शेतकऱ्यांच्या बँका खात्यामध्ये 6000 रुपये अशा कमी जास्त प्रमाणामध्ये या निधीचे वितरण झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळाले त्यांना योजनेतील संपूर्ण रक्कम खात्यामध्ये प्राप्त झाली आहे.
PM किसान सम्मान निधी योजना : या पद्धतीने करा तक्रार
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- तिथे तुम्हाला लॉगिन करायचा आहे.
- जर तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे.
- त्यानंतर रजिस्टर कंप्लेंट या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुमची तक्रार लिहायचे आहे.
- तक्रारी सोबत त्यांचे कागदपत्र जोडायचे आहेत.
- तुमचे नाव पत्ता बँक क्रमांक मोबाईल क्रमांक जोडायचा आहे.
- त्यानंतर सबमिट वर क्लिक करायचा आहे.
- अजून पर्यंत ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्यायची आहे.
👉ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी केव्हा नमो शेतकरी निधीचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला त्या संबंधित वेबसाईटवर भेट द्यायची आहे आणि तिथे तक्रार नोंद करायची आहे त्यापूर्वी तुम्हाला ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का याबद्दल माहिती करून घ्यायचे आहे जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळालेला नसेल.
अधिकृत वेबसाईट: 👉 येथे क्लिक करा
धन्यवाद ! 🙏