Share Market Earn Money 2024 : शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर ‘या’ चूका टाळा…!

gokulkumbhar.com
8 Min Read
Share Market Earn Money 2024

Share Market Earn Money 2024 : नमस्कार मित्रांनो, MARATHI ZONE मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही सुरुवातीपासूनच जागरूक राहिल्यास वर्षाच्या अखेरीस होणारे नुकसान टाळता येईल.

Contents
Share Market Earn Money 2024 : झटपट पैसे कमविण्याचा विचार सोडा एकाच ठिकाणी गुंतवणूक टाळा इतरांचे अनुकरण टाळास्टॉप लॉस फॉलो करा व वेळेत बाहेर पडा Share Market Earn Money 2024 : या पद्धतीने करा शेअर मार्केट मधून पैसे कमावण्यास सुरुवातशेअर बाजारात सुरुवात कशी करायची ?छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करा !बड्या कंपन्यांची निवड करागुंतवणूक सुरू ठेवण्याची गरजपेनी स्टॉक्सपासून दूर राहाघसरणीला घाबरू नकाकमाईचा काही हिस्सा सुरक्षित ठिकाणी गुंतवाShare Market Earn Money 2024 FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्नमी शेअर बाजारातून पैसे कमवू शकतो का ?तोटा कसा टाळावा आणि शेअर बाजार निर्देशांकात सातत्याने कमाई कशी करावी ?शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस म्हणजे काय ?तुम्ही खराब स्टॉक कसे टाळाल ?इंट्राडे ट्रेडिंग फायदेशीर आहे का ?स्टॉप लॉस किती असावा ?स्टॉप लॉस महत्वाचे का आहे ?

शेअर बाजारात गुंतवणूक करून भरमसाठ कमाई करण्याचे अनेकजण प्रयत्न करतात, पण फक्त काही मोजकेच यशस्वी होतात. ९०% हून अधिक रिटेल विक्रेते बाजारातून पैसे कमावण्यात अपयशी ठरतात, पण यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे १०% किरकोळ गुंतवणूकदार पैसे कमवण्यात यशस्वी ठरतात कारण ते नियम पाळतात

Share Market Earn Money 2024

Share Market Earn Money 2024 : झटपट पैसे कमविण्याचा विचार सोडा 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकजण झटपट पैसे कमविण्याच्या नादात लाखो रुपये गमवतात. फ्यूचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करणाऱ्या 10 पैकी 9 जणांचे नुकसान होते. त्यामुळे कधीही दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्या. 

समजा, तुम्हाला एखाद्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची आहे मात्र जास्त पैसे नाहीत, अशावेळी म्युच्युअल फंडचा देखील विचार करू शकता. तुम्ही अगदी 500 रुपयांपासून देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. लक्षात घ्या की, शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची यात त्वरित परतावा मिळणे अवघड असते. दीर्घकालीन उद्देशाने गुंवणूक केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

एकाच ठिकाणी गुंतवणूक टाळा 

तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की पोर्टफोलियोमध्ये विविधता हवी. यामागचे प्रमुख कारण म्हणजे यामुळे नुकसान होण्याची क्षमता कमी होते. तुम्ही स्टॉक्स, बाँड्स, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना स्टॉक्स, म्युच्युअल फंड, ईटीएफमध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलियोमध्ये विविधता आणू शकता.

याशिवाय, विविध क्षेत्रातील कंपन्या, लार्ज-मिड कॅपच्या आधारावर स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान टाळू शकता.

इतरांचे अनुकरण टाळा

अनेकदा आपण मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांचा सल्ला घेतो व कोणत्याही कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो. मात्र, इतरांचा सल्ला घेण्याच्या नादात तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. सर्वचजण एकाच कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतायत याचा अर्थ तुम्हीही तेच करायला हवे असे नाही. 

शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असल्यास गर्दीचा भाग होणे टाळायला हवे. सल्ला सर्वांचा घ्या, परंतु गुंतवणूक करताना नेहमी स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला हवा.  संपूर्ण अभ्यास करून विचारपूर्वक गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास जोखीम कमी होते. 

Forex Treding Information 2024 : जाणून घ्या फॉरेक्स ट्रेडिंगची A to Z माहिती👉येथे क्लिक करा

स्टॉप लॉस फॉलो करा व वेळेत बाहेर पडा 

तुमच्यासोबतही अनेकदा असे झाले असेल की एखाद्या स्टॉक्समध्ये नफा दिसल्यावर आपण त्वरित त्यातून बाहेर पडतो. परंतु, स्टॉक्सची किंमत कमी झाल्यास त्यातून बाहेर पडत नाही. तोट्यात असताना स्टॉक्स कसे विकायचे? असा प्रश्न निर्माण होतो. परंतु, यामुळे तुमचे अधिकच नुकसान होण्याची शक्यता असते.

तुम्ही स्वतःला स्टॉप लॉस फॉलो करण्याची सवय लावायला हवी. स्टॉप लॉस फॉलो केल्यास तुमचे नुकसान कमी होईल. तसेच, अनेकजण एखादी कंपनी आवडीचे आहे म्हणून त्याचे शेअर्स विकणे टाळतात. मात्र, कंपनीचे स्टॉक्स चांगली कामगिरी करत नसल्यास वेळेत त्यातून बाहेर पडणे कधीही तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

Share Market Earn Money 2024 : या पद्धतीने करा शेअर मार्केट मधून पैसे कमावण्यास सुरुवात

शेअर बाजारात सुरुवात कशी करायची ?

मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु कारण्यापूर्वी शेअर बाजार नेमकं काय म्हणजे काय हे जाणून घ्या. शेअर बाजारात कामकाज कसं होतं, लोक कसे कमावतात याबाबत समजून घेणं महत्त्वाचे आहे, कारण शेअर बाजार पैसे कमावण्याचे यंत्र नाही. आजच्या डिजिटल काळात तुम्ही घरबसल्या ऑनलाइन याविषयी माहिती गोळा करू शकता. तसेच तुम्ही या प्रकरणात आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता, जो तुम्हाचे सुरुवातीला योग्य मार्गदर्शन करेल.

छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करा !

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे, हे गरजेचे नाही. बहुतेक लोक हीच चूक करतात आणि आपली संपूर्ण बचत गुंतवतात. मग बाजारातील चढउतार सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही अगदी छोट्या रकमेतूनही गुंतवणूक म्हणजेच फक्त पाच रुपयातूनही सुरुवात करू शकता.

बड्या कंपन्यांची निवड करा

सुरुवातीला रिटर्नवर जास्त लक्ष केंद्रित करणे टाळा कारण जास्त परतावा मिळवण्यासाठी लोक मूलभूतपणे मजबूत नसलेल्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर अडकतात. म्हणून मूलभूतपणे मजबूत असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरु करा. आणि एकदा तुम्हाला अनुभव मिळाला की तुम्ही कोणताही धोका पत्करू शकता.

गुंतवणूक सुरू ठेवण्याची गरज

जेव्हा तुम्ही छोट्या रकमेतून गुंतवणूकीस सुरुवात करता तेव्हा दर महिन्याला गुंतवणूक वाढवत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवा. बाजारात काही वर्षे सातत्याने गुंतवणूक करत राहिल्यास तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. अनेकदा बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होतो.

पेनी स्टॉक्सपासून दूर राहा

रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदार अनेकदा स्वस्त शेअर्सवर लक्ष केंद्रित करतात आणि १०-१५ रुपयांच्या समभागांचा पोर्टफोलिओत समावेश करतात आणि नंतर घसरणीत घाबरतात. स्वस्त शेअर्समध्ये कमी गुंतवणूक करून जास्त कमाई करता येईल असे त्यांना वाटते, पण हे चुकीचं आहे. कंपनीची वाढ लक्षात घेऊन नेहमी शेअर्सची करा. ज्या कंपनीचा व्यवसाय चांगला आहे आणि व्यवसाय चालवणारे व्यवस्थापन चांगले आहे अशा कंपनीतच गुंतवणूक करा.

घसरणीला घाबरू नका

शेअर बाजारात जेव्हा घसरण होते तेव्हा तुमची गुंतवणूक वाढवा. अनेकदा रिटेल गुंतवणूकदार जोपर्यंत कमावतात तोपर्यंत गुंतवणूक करत राहतात, पण जसजसं बाजार घसरतो तसतसं रिटेल इन्व्हेस्टर घाबरू लागतात आणि नंतर मोठ्या नुकसानीच्या भीतीने शेअर्स स्वस्तात विकतात, तर मोठे गुंतवणूकदार खरेदीसाठी किमती कमी होण्याची प्रतीक्षा करतात.

कमाईचा काही हिस्सा सुरक्षित ठिकाणी गुंतवा

शेअर बाजारातील कमाईचा काही भाग सुरक्षित गुंतवणूक म्हणून इतरत्र गुंतवा. याशिवाय, अधूनमधून होणार नफा कॅश करा. प्रत्येक रिटेल गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नकळत शेअर बाजारापासून दूर राहावे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. देशातील मोठ्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ फॉलो करावे आणि म्हणणे गांभीर्याने घ्यावे.

धन्यवाद ! 🙏

Share Market Earn Money 2024 FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी शेअर बाजारातून पैसे कमवू शकतो का ?

तुम्ही कदाचित विचार करत असाल, “तुम्ही स्टॉक मार्केटमधून किती कमाई करू शकता?”. बरं, कमाई १०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. जर तुम्ही पुरेसे कुशल असाल आणि तुमची रणनीती योग्य असेल तर महिन्याला 1 लाख किंवा त्याहूनही जास्त .

तोटा कसा टाळावा आणि शेअर बाजार निर्देशांकात सातत्याने कमाई कशी करावी ?

नियमानुसार, 20% पेक्षा कमी स्टेक असलेल्या प्रवर्तकांसह 300 कोटींपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांना टाळा . शेअर बाजारातून सातत्याने कमाई करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करणे आणि त्यांना योग्य कालावधीसाठी धरून ठेवणे.

शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस म्हणजे काय ?

स्टॉप लॉस म्हणजे काय. व्याख्या: स्टॉप-लॉस हे एखाद्या विशिष्ट किंमतीच्या बिंदूवर पोहोचल्यावर मालमत्ता विकण्यासाठी आगाऊ ऑर्डर म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. व्यापारात तोटा किंवा फायदा मर्यादित करण्यासाठी याचा वापर केला जातो. संकल्पना अल्पकालीन तसेच दीर्घकालीन व्यापारासाठी वापरली जाऊ शकते.

तुम्ही खराब स्टॉक कसे टाळाल ?

हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) किंवा म्युच्युअल फंडांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे . तुम्ही वैयक्तिक शेअर्समध्ये गुंतवणूक करत असल्यास, तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या स्टॉकचे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रत्येक कंपनीला तुम्ही पूर्णपणे समजून घ्या.

इंट्राडे ट्रेडिंग फायदेशीर आहे का ?

जर तुम्ही बाजारातील ट्रेंड आणि पॅटर्नचे विश्लेषण करू शकत असाल आणि तुमची एंट्री आणि बाहेर पडण्याची योग्य वेळ असेल तर इंट्राडे ट्रेडिंग फायदेशीर आहे . बाजारातील अस्थिरतेमुळे इंट्राडे ट्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात जोखीम असते, त्यामुळे नवशिक्यांनी तोटा कमी करण्यासाठी स्टॉप-लॉस ऑर्डरचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

स्टॉप लॉस किती असावा ?

सामान्यतः, ज्याला तोट्याचा उच्च धोका टाळायचा आहे तो स्टॉप-लॉस ऑर्डर खरेदी किमतीच्या 10% वर सेट करतो. उदाहरणार्थ, जर शेअर रु.ला विकत घेतला असेल तर. 100 आणि स्टॉप-लॉस ऑर्डर मूल्य 10% (रु. 90) वर सेट केले आहे, अशा परिस्थितीत जेव्हा किंमत रु. पर्यंत पोहोचते.

स्टॉप लॉस महत्वाचे का आहे ?

स्टॉप लॉस तुम्हाला तुमचा तोटा कमी करण्यास मदत करते आणि शेअर बाजारातील मोठ्या तोट्यापासून तुमचा विमा काढते . अनेक वेळा, जेव्हा किंमत खूप घसरते, तेव्हा तुम्ही स्टॉप ऑर्डर न दिल्यास तुमचा स्टॉक ट्रेड खूपच कुरूप झाला असता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *