शेअर मार्केट म्हणजे काय ? सुरुवात करा फक्त ₹ १०० पासून | जाणून घ्या संपूर्ण माहिती…! Share Market In Marathi

gokulkumbhar.com
17 Min Read
Share Market Informetion In Marathi

Share Market in Marathi : शेअर मार्केट म्हणजे अस मार्केट जिथे शेअर्सची खरेदी – विक्री केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर म्हणजे नक्की काय? एक साधं उदाहरण समजून घेऊयात. समजा, तुम्ही तुमच्या गावी एक चहाचा बिझनेस सुरू केलात. बिझनेस सुरू होवून २ वर्ष झाली आहेत आणि बिझनेस अगदी मस्त चालला आहे. पण आता तुम्हाला बिझनेस हा फक्त गावापुरता मर्यादित नं ठेवता मोठ्या शहरात घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हवाय मोठा पैसा. पण बँकमध्ये लोन घ्यायला गेलात तर बँक खूप सारा व्याज लावतेय, मग आता करायच काय?

Contents
Share Market Informetion In Marathiस्टॉक एक्स्चेंज काय आहे? (What is Stock Exchange in Marathi)बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( Bombay Stock Exchange )नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) शेअर मार्केटमधील कंपन्यांचे प्रकार ( Types of Companies in Share Market )Share Market In Marathiस्टॉक एक्स्चेंजचे फायदे | Share Market In Marathiशेयर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार | Type of Share Market Tradingआपला स्टॉक ब्रोकर कसा निवडायचा ? Share Market informetion In Marathiस्टॉक निवडणे आणि गुंतवणूक करणे | Share Market informetion In Marathiशेअर मार्केट डाऊन का होते ? Why the stock market goes down in Marathiशेवट कुठे व कसा कराल ? Share Market informetion In MarathiTop Indian share market investor |Share Market informetion In Marathi अधिकृत वेबसाईट: 👉 येथे क्लिक करा🙏धन्यवाद !🙏सारांश,FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न |Share Market informetion In Marathiशेअर कसे निवडावे?मी शेअर मार्केट कसे सुरू करू?बँक निफ्टी म्हणजे काय?इंट्राडे ट्रेडिंगसाठी किती पैसे आवश्यक आहेत?

Share Market Informetion In Marathi

तुम्ही शेअर मार्केटमध्ये जाणार आणि भारताच्या अख्या नागरिकांकडे पैसे मागणार तुमचा व्यवसाय वाढवायला. आता नागरिक काय फ्रीमध्ये पैसे देणार तुम्हाला तर अजिबात नाही. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेणार तर तुम्हाला पण काहीतरी द्याव लागेल ना? त्यालाच म्हणतात शेअर – थोडक्यात काय तर तुम्ही तुमच्या व्यवसाय मधला थोडासा हिस्सा / भागीदारी नागरिकांना देणार आहात,आणि त्या नागरिकाला शेअर होल्डर बोलं जात. कारण त्यांच्याकडे तुमच्या व्यवसायाचे काही शेअर्स असतात. आणि हे शेअर होल्डर एकाप्रकारे तुमच्या व्यवसायाचे मालक बनतात, पण जितका पैसा त्यांनी दिलय त्या हिशोबने त्यांना तो हक्क मिळतो. अगदी याचप्रमाणे मोठ मोठ्या कंपन्या जसं की HDFC, WIPRO, TATA आणि अशा अनेक कंपन्या बिझनेससाठी पैसा जमा करतात.

ही शेअर मार्केटची बेसिक संकल्पना झाली. आता आपण Stock Exchage काय आहे ते समजून घेऊयात

Share Market Informetion In Marathi
Share Market Informetion In Marathi

Share Market Earn Money 2024 : शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर ‘या’ चूका टाळा…!👉येथे क्लिक करा

स्टॉक एक्स्चेंज काय आहे? (What is Stock Exchange in Marathi)

स्टॉक एक्स्चेंज या नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल की, स्टॉक एक्स्चेंज नक्की काय आहे. स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर किंवा हिस्सा. एक्स्चेंज म्हणजे देवाण-घेवाण किंवा खरेदी- विक्री. विविध कंपन्यांच्या शेअर्सची देवाण घेवाण किंवा खरेदी-विक्री करण्याच ठिकाण म्हणजे स्टॉक एक्स्चेंज.

भारतामध्ये मुख्य २ मुख्य स्टॉक एक्स्चेंज आहेत आणि ते म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ( BSE – Bombay Stock Exchange ) आणि दुसरं म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ( NSE- National Stock Exchange )

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( Bombay Stock Exchange )

– स्थापना: ९ जुले १८७५

– भारतातील तसेच आशियातील सर्वांत जुने Stock exchange म्हणुन ओळखले जाते.

– ७००० पेक्षा जास्त कंपन्या या Stock exchange वर लिस्टेड आहेत.

– बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) आहे ज्यामध्ये भारतातील टॉप ३० कंपन्याचा समावेश होतो.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange)

– स्थापना: २७ नोव्हेंबर १९९२

– भरतातील सगळ्यात मोठे Stock exchange म्हणून ओळखले जाते.

– १६०० पेक्षा जास्त कंपन्या या Stock exchange वर लिस्टेड आहेत.

– नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स Nifty50 आहे ज्यामध्ये भारतातील टॉप ५० कंपन्यांचा समावेश होतो.

शेअर मार्केटमधील कंपन्यांचे प्रकार ( Types of Companies in Share Market )

भारतीय शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचे वर्गीकरण त्यांच्या बाजार भांडवलाच्या (Market Cap) आधारे केले आहे. हे वर्गीकरण भारतातील शेअर मार्केटच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( SEBI – Securities and Exchange Board of India ) करते. (सेबीला शेअर मार्केटच पोलीस म्हणून आपण बोलू शकतो.) आता आपण मार्केट कॅपनुसार विविध कंपन्यांचे प्रकार नीट समजून घेऊयात. सेबीने Share Market मधील कंपन्यांना खालील वर्गात वाटून दिलं आहे.

Share Market In Marathi

  1. लार्ज कॅप कंपन्या (Large Cap Companies):
    • लार्ज कॅप कंपन्या म्हणजे २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या कंपन्या असतात. या कंपन्या आपापल्या सेक्टरमध्ये टॉपवर असतात. त्यांच मार्केटमध्ये मोठ नाव असतं आणि लोकांना या कंपन्यांवर चांगला विश्वास असतो. या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणे कमी जोखमीचं असते. भारतातील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक इ. यांचा समावेश होतो.
  2. मिड कॅप कंपन्या (Mid Cap Companies):
    • मिड कॅप कंपन्या म्हणजे ज्यांचे मार्केट कॅप ५,००० कोटी ते २०,००० कोटी या दरम्यान असते. या कंपन्या सामान्यत: लार्ज-कॅप कंपन्यांपेक्षा जास्त जोखमीच्या असतात आणि या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे मध्यम रिस्कचे असते. मिड-कॅप कंपन्या सामान्यत: वाढत्या कंपन्या असतात ज्यांचा बिझनेस ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो आणि त्या लार्ज-कॅप कंपन्या बनण्याच्या मार्गावर असतात. भारतातील मिडकॅप कंपन्यांची उदाहरणे म्हणजे एमआरएफ, टोरंट फार्मास्युटिकल्स आणि इंद्रप्रस्थ गॅस इ.
  3. स्मॉल-कॅप कंपन्या (Small Cap Companies):
    • स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे ज्यांचे मार्केट कॅप १,००० कोटी ते ५,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असते. लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांपेक्षा या कंपन्या सामान्यत: खूप जास्त रिस्क असतात. पण त्यांच्यात जास्त रिटर्न मिळण्याची क्षमता देखील असते. स्मॉल-कॅप कंपन्या सामान्यत: नवीन कंपन्या असतात ज्या मार्केटमध्ये स्वत: ला स्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. भारतातील स्मॉल कॅप कंपन्यांची उदाहरणे म्हणजे न्यूक्लिअस सॉफ्टवेअर, ओरिएंट इलेक्ट्रिक आणि केएनआर कन्स्ट्रक्शन्स इ.
  4. मायक्रो-कॅप कंपन्या (Micro-cap Companies):
    • मायक्रो कॅप कंपन्या म्हणजे १,००० कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्या. या कंपन्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने सर्वात लहान असतात आणि सर्वात रिस्क याच कंपन्यांमध्ये असते. सामान्यत: या स्टार्ट-अप किंवा छोट्या कंपन्या असतात ज्या त्यांच्या ग्रोथच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असतात. मायक्रो-कॅप कंपन्यांमध्ये सर्वाधिक रिटर्न मिळण्याची क्षमता असते पण यामध्ये रिस्क पण तेवढीच असते. नवीन इनवेस्टरने यापासून लांब राहिलेल बर असत.,

लवकरच मिळणार दुसरा हप्ता…नमो शेतकरी महासम्मान निधी योजना २०२३|Namo shetkari yojana 2nd installment date 👉येथे क्लिक करा

स्टॉक एक्स्चेंजचे फायदे | Share Market In Marathi

  1. बिझिनेससाठी पैसा :- स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने अनेक कंपन्या त्यांचे शेअर्स पब्लिकला (म्हणजेच आपण) विकून पैसा गोळा करतात.
  2. लिक्विडीटी (Liquidity):– लिक्विडीटी म्हणजे पैशाची गरज पडली की लगेच पैसा हातात आला पाहिजे. जसं की गोल्ड, विकलं की लगेच कॅशमशे रूपांतर करता येत. स्टॉक एक्सचेंजमुळे तुम्ही शेअर्स कधीही विकू शकता आणि त्याचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येतात.
  3. गुंतवणूकीची संधी:- स्टॉक एक्सचेंजमुळेच तर आपण कंपन्याचे शेअर्स विकत घेऊ शकतो मग कंपनी मोठी असो की छोटी आणि त्यावर रिटर्न मिळवू शकतो. यातून पैसा वाढवता येतो.
  4. अर्थव्यवस्थेची वाढ:- प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी एक्सचेंज एक महत्वाचा भाग आहे. स्टॉक एक्सचेंजमुळे कंपन्यांना बिझिनेस वाढवायला पैसा मिळतो त्यामुळे तर आपल्या अनेक लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतात.
  5. पारदर्शकता (Transparency):– स्टॉक एक्सचेंज कंपन्यांना त्यांची आर्थिक माहिती जसं प्रॉफिट, लॉस, अकाउंट, बैलेंस शीट इ. लोकांसमोर जाहीर करण्यास बंधनकारक करते. त्यामुळे तर गुंतवणूकदार पैसा इनवेस्ट करायचा की नाही याबद्दल योग्य तो निर्णय घेऊ शकतात.

आता आपण पुढे शेअर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार पाहणार आहोत,

शेयर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार | Type of Share Market Trading

  1. इंट्रा डे ट्रेडिंग | Intraday Trading
    • इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये स्टॉक मार्केट सकाळी ०९:१५ am वाजता सुरु होते, आणि सुरु झाल्यानंतर शेयर्स ची खरेदी करावी लागते आणि Stock Market बंद होण्याच्या आधी म्हणजेच ०३:३० pm च्या आधी त्या शेअर्स ची विक्री करायची असते. इंट्रा डे ट्रेडिंग केवळ एका दिवसापुरतेच मर्यादित असते. जर आपण स्टॉक मार्केट बंद होण्याच्या आधी शेअर्स ची विक्री केली नाही तर तो शेअर्स असेल त्या किमतीला आपोआप विकला जाईल.
  2. स्विंग ट्रेडिंग | Swing Trading
    • स्विंग ट्रेडिंग मध्ये शेअर्स काही कालावधीसाठी खरेदी केले जातात यामध्ये कालावधी हा काही दिवसाचा, हप्त्याचा किंवा काही महिन्याचा सुद्धा असू शकतो. जेव्हा बाजारा मध्ये शेअर्स च्या किमती कमी होतात तेव्हा शेयर्स खरेदी केले जातात आणि काही कालावधी पर्यंत शेअर्स च्या किमती वाढल्यानंतर या शेअर्स ची विक्री केली जाते.
  3. स्कॅल्पर ट्रेडिंग | Scalper Trading
    • स्कॅल्पर ट्रेडिंग यामध्ये स्टॉक खरेदी केल्याच्या काही मिनिटातच या स्टॉक ला विकले जाते. अश्या प्रकारच्या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. पण त्यामध्ये जोखीम सुद्धा जास्त असते.
  4. लाँग टर्म ट्रेडिंग | Long Term Trading
    • लाँग टर्म ट्रेडिंग मध्ये शेअर्स दीर्घकाळासाठी खरेदी केले जातात यामध्ये कालावधी हा सहा महिने किंवा दहा वर्षापर्यंत असतो. या काळात जर शेयर्स च्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला तर त्या व्यक्ती ला खूप फायदा होतो. तसेच या प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये जोखीम खूप कमी असते.

आपला स्टॉक ब्रोकर कसा निवडायचा ? Share Market informetion In Marathi

ऑनलाईन स्टॉक ब्रोकर ची निवड करणे ही सर्वात महत्वाची पायरी आहे, कारण याच स्टॉक ब्रोकर च्या साहाय्याने आपण स्टॉक खरेदी आणि विक्री करू शकतो. भारतात स्टॉक ब्रोकर चे दोन प्रकार आहेत.

  1. पूर्ण-सेवा दलाल | Full Service Broker
    • पूर्ण-सेवा दलाल म्हणजेच फुल्ल सर्व्हिस ब्रोकर जे स्टॉक, वस्तू आणि व्यापार, संशोधन सल्लागार म्हणून सुविधा प्रदान करतात. तसेच आपण कोणते शेअर खरेदी करायला हवे आणि कोणते विकायला हवेत याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतात. यामुळेच हे दलाल डिस्काउंट ब्रोकर पेक्षा जास्त कमिशन आकारतात. तसेच ते फॉरेक्स, म्युच्युअल फंड्स, आयपीओ, एफडी, बॉन्ड्स आणि विमा गुंतवणूकीस सुविधा देतात.
    • ICICI Direct, Kotak Security, HDFC Securities, IIFL Securities, Sharekhan, Motilal Oswal इत्यादी Full Service Broker ची उदाहरणे आहेत.
  2. सूट दलाल | Discount Brokers
    • सवलत दलाल म्हणजेच डिस्काउंट ब्रोकर हे ग्राहकांसाठी फक्त व्यापार सुविधा प्रदान करतात. ते सल्लागार म्हणून काम करीत नाहीत. हे ब्रोकर जे ग्राहक स्वतः टेकनिकल, फंडामेंटल ऍनालिसिस करतात त्यांच्या साठी योग्य आहेत. ते कमी दलाली, उच्च गती आणि समभाग, वस्तू आणि चलन डेरिव्हेटिव्ह मध्ये व्यापार करण्यासाठी एक सभ्य व्यासपीठ ऑफर करतात.
    • जसे कि Zeroda, Upstox, Angel One, Groww, 5Paisa, Paytm Money इत्यादी Discount Brokers ची उदाहरणे आहेत.

स्टॉक निवडणे आणि गुंतवणूक करणे | Share Market informetion In Marathi

आपल्या सभोवतालच्या कंपन्यांकडे लक्ष द्या. आपल्याला कोणत्याही कंपनीचे उत्पादन किंवा सेवा आवडत असल्यास, त्याच्या मूळ कंपनीबद्दल स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड आहे की नाही, तिची सध्याची स्टॉक प्राईस इत्यादी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सर्च इंजिन वर सखोल अभ्यास करा.

दररोजच्या जीवनात आपण वापरत असलेली बहुतेक उत्पादने किंवा सेवा – साबण, शैम्पू, सिगारेट, बँक, पेट्रोल पंप, सिम कार्ड किंवा अगदी आपल्या अंतर्गत कपड्यांपासून प्रत्येकाच्या मागे एक कंपनी आहे. त्यांच्याबद्दल संशोधन सुरू करा, आणि योग्य स्टॉक निवडून त्यामध्ये गुंतवणूक करा.

उदाहरणार्थ :-

जर आपण बर्‍याच काळासाठी एचडीएफसी डेबिट / क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्या अनुभवाने समाधानी असाल तर HDFC बँक बद्दल अधिक चौकशी करा. भारतातील सर्व लिस्टेड कंपन्यांची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. ‘HDFC Share Price’ चा फक्त साधा ‘Google Search’ तुम्हाला बर्‍याच प्रकारची महत्वाची माहिती उपलब्ध करून देईल.

तसेच, जर तुमच्या शेजाऱ्याने अलीकडे नवीन कार विकत घेतली असेल तर त्यांनी त्या कार ची मूळ कंपनी बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जसे की, ती कंपनी कोणती इतर उत्पादने ऑफर करते आणि कंपनी अलिकडे कसे काम करत आहे, त्याची विक्री, नफा इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या असतील.

अशाप्रकारे योग्य टेकनिकल आणि फंडामेंटल ऍनालिसिस करूनच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा. सुरुवातीला लोकप्रिय लार्ज-कॅप कंपन्यांसह प्रारंभ करा आणि एकदा आपण बाजारामध्ये आरामदायक असल्यास, मिड आणि स्मॉल कॅप मध्ये सुद्धा गुंतवणूक करा.

शेअर मार्केट डाऊन का होते ? Why the stock market goes down in Marathi

सध्याच्या काळात शेअर बाजार खाली येण्याची अनेक कारणे आहेत. चला जाणून घेऊया.

आपल्यास कदाचित माहित असेल की एका मोठ्या आपत्तीमुळे, Share Market Down होत असते. जसे कि आता, कोरोना व्हायरस मुळे ग्राहकांच्या वागणुकीत (consumer behavior) मोठा बदल होत आहे, यामुळे व्यवसायांचे बरेच नुकसान झाले, आणि याचमुळे ते short-term earnings साठी त्यांचा शेअर्स विकतात. आणि अशाच काही कारणांमुळे मुळे शेअर बाजारामध्ये चढ-उतार होत असतात.

आता समजून घ्या या कोरोना व्हायरस संकटासाठी कोणताही योग्य तोडगा लवकर आलेला नव्हता, तो पर्यंत ग्राहक सुद्धा गुंतवणूक करत नव्हते. आणि जेव्हा Corona Vaccines आली त्यांनतर हळूहळू मार्केट वरती यायला लागलं.
नंतर सरकार पुन्हा Lockdown करतंय समजल्यावर पुन्हा शेयर्स डाउन झाले.

तर याच मार्केट मध्ये चालू असलेल्या घडामोडींवर Share Market Down होत असते.

शेवट कुठे व कसा कराल ? Share Market informetion In Marathi

शेअर मार्केट मधून बाहेर पडायची योजना ठेवणे खूप गरजेचे असते. स्टॉकमधून बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर नफा बुक करून किंवा तोटा कमी करून. चला या दोन्ही परिस्थितीवर चर्चा करूया. मूलभूतपणे, जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओ मध्ये एक चांगला स्टॉक विकला पाहिजे तेव्हा तेथे फक्त चार परिस्थिती असतात.

  • जेव्हा आपल्याला पैशाची वाईट रीतीने गरज असते.
  • जेव्हा स्टॉकची मूलभूत तत्त्वे बदलली जातात.
  • जेव्हा आपल्याला गुंतवणूकीची चांगली संधी मिळेल.
  • जेव्हा आपण आपली गुंतवणूकीची उद्दिष्टे गाठता.

जर आपली गुंतवणूकीची उद्दीष्टे पूर्ण झाली तर आपण सुखाने स्टॉक मधून बाहेर पडू शकता. किंवा किमान, आपल्या स्टॉक पोर्टफोलिओ मधून नफ्याचा एक भाग बुक करा आणि ते इतर अधिक सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळवा. दुसरीकडे, जर स्टॉक आपल्या जोखमीच्या भूक पातळीच्या खाली आला असेल तर, पुन्हा स्टॉकमधून बाहेर पडा.

येथे काही इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत जे प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये सुरुवात करताना माहित असणे आवश्यक आहे.

  1. सुरवात लहान करा.
  2. आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा.
  3. ब्लू-चिप स्टॉक मध्ये गुंतवणूक करा.
  4. मोफत टिप्स किंवा एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याने कधीही गुंतवणूक करु नका.
  5. गर्दीच्या दिशेने जाणे टाळा.
  6. योग्य अभ्यास करून आणि ऍनालिसिस करून गुंतवणूक करा.
  7. शिस्त लावा आणि आपल्या योजनेनुसार कृती करा.
  8. नियमितपणे गुंतवणूक करा आणि सतत तुमची गुंतवणूक रक्कम वाढवा.
  9. सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर मार्केट बद्दल विविध आणि नवनवीन गोष्टी शिकणे सुरू ठेवा.
Top Indian share market investor |Share Market informetion In Marathi
  1. राकेश झुंझुनवाला
  2. राधाकिशन दमानी
  3. रमेश दमानी
  4. रामदेव अग्रवाल
  5. विजय केडिया
  6. नेमीश शाह
  7. पोरिंजू वेलियाथ
  8. डॉली खन्ना
  9. आशिष कचोलिया
  10. चंद्रकांत संपत

अधिकृत वेबसाईट: 👉 येथे क्लिक करा

🙏धन्यवाद !🙏
सारांश,

मला आशा आहे की तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय ? बद्दल सर्व माहिती मिळाली असेल. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असल्यास, कृपया मला ईमेल किंवा टिप्पण्यांद्वारे कळवा. आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला शेअर मार्केटची माहिती उपयुक्त वाटत असेल, तर कृपया ती तुमच्या मित्रांसह शेअर करण्याचे सुनिश्चित करा जेणेकरून ते देखील या लेखामधून शिकू शकतील.

FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न |Share Market informetion In Marathi

शेअर कसे निवडावे?

प्रत्येक शेयर हा थोडाफार वर खाली होत असतो । जेव्हा मार्केट थोडा डाउन होतो तेव्हा खरेदी करावी । आय टी, फार्मा, बँकिंग, FMCG, ऑटोमोबाईल,केमिकल,असे बरेच क्षेत्र आहे। शेयर निवडताना वेग वेगळ्या क्षेत्रातील घ्यावे ।

मी शेअर मार्केट कसे सुरू करू?

डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा, निधी जमा करा आणि ब्रोकरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे व्यापार सुरू करा . ऑनलाइन ट्रेडिंगमधील सर्व नफा कर आकारणीच्या उद्देशाने घोषित करण्याचे लक्षात ठेवा. तुमचा ट्रेडिंग अनुभव वाढवण्यासाठी रिअल-टाइम डेटा, स्टॉप-लॉस ऑर्डर आणि मार्जिन खाती ऑफर करणाऱ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करा.

बँक निफ्टी म्हणजे काय?

बँक निफ्टी हा 12 बँकिंग कंपनी समभागांचा समावेश असलेला निर्देशांक आहे. या समभागांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर खरेदी-विक्री केली जाते. बँक निफ्टी निर्देशांकात फक्त बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉक असतात. बँक NIFTY मध्ये फक्त बँकिंग क्षेत्रातील समभागांचा समावेश असल्याने, तो सर्वात तरल आणि उच्च भांडवली मानला जातो.

इंट्राडे ट्रेडिंगसाठी किती पैसे आवश्यक आहेत?

इंट्राडे ट्रेडिंग सुरू करण्यासाठी कोणतीही निश्चित रक्कम नाही . तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही रकमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता. जर तुम्ही नवीन व्यापारी असाल तर लहान सुरुवात करण्याची शिफारस केली जाते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *