Sukanya Samriddhi Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. त्यापैकी केंद्र सरकारची एक योजना जी विशेषकरून देशातील लहान मुलींसाठी योजना राबविण्यात येते. ती योजना आहे “सुकन्या समृद्धी योजना(SSY)” या योजनेबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
त्यामध्ये काय आहे हि सुकन्या समृद्धी योजना, उद्दिष्ट, सुकन्या पोस्ट ऑफिस स्कीम, फॉर्म, त्याचे फायदे, पात्रता, लाभ, अर्ज कुठे व कसा करायचा, अर्ज करण्यासाठी बँका, व्याजदर, किती काळ सुरु राहील, अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Sukanya Samriddhi Yojana 2024 : “सुकन्या समृद्धी योजना (SSY)”
Sukanya Samriddhi Yojana ही एक मुलींच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना मानली जाते. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दरमहा योग्य ती गुंतवणूक करून मुदतेनंतर चांगल्या व्याजासहित परतावाही मिळतो. या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक मर्यादा ही 250 रुपये आहे आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक मर्यादा आहे.
दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजनाची सुरुवात करण्यात आली. सुकन्या समृद्धी योजना ही “बेटी बचाओ बेटी पढाओ” या मोहिमे अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत या योजनेला सुरुवात करण्यात आलेली.
Sukanya Samriddhi Yojana मार्फत नवजात कन्येच्या आई-वडिलांना मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा करता यावे, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
Sukanya Samriddhi Yojana Highlights : ठळक मुद्दे
योजना | सुकन्या समृद्धी योजना |
व्दारा सुरुवात | भारत सरकार |
सुरु करण्याची तारीख | 22 जानेवारी 2015 |
लाभार्थी | 10 वर्षा खालील मुलीं |
योजनेचा उद्देश्य | देशातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
अर्ज करण्याचे माध्यम | इंडिया पोस्ट / बँक |
प्रकार | लघु बचत योजना |
💁 महत्वाचे – सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एका परीवारातील केवळ दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो, जर एका परिवारात दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्या कुटुंबातील दोन मुलींनाच लाभ घेता येईल, परंतु जर एखाद्या परिवारात जुळ्या मुली असतील म्हणजे एक मुलगी असतांना पुन्हा जुळ्या मुली झाल्या तर त्या तिन्ही मुलींच्या नावाने स्वतंत्रपणे बचत खाते उघडण्यात येऊ शकते. या योजनेच्या अंतर्गत ज्या नागरिक आपल्या मुलींच्या नावाने बचत खाते उघडू इच्छितात, तसेच ज्यांना आपल्या मुलीच्या शिक्षणसाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करवयाचे आहे ते नागरिक या योजनेमध्ये बचत खाते उघडू शकतात. या योजनेंतर्गत 10 वर्षा पर्यंतच्या मुलींचे बचत खाते उघडले जाऊ शकते, शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे.
सुकन्या समृद्धी योजना(SSY) संकल्पना आणि उद्देश : Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश गरीब साधारण परिवारातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच त्यांना स्वावलंबी होता यावे, शैक्षणिक प्रगती करून समृद्ध जीवन जगता यावे. तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व्हावे, स्त्री भ्रूण हत्या थांबण्यात यावी हा या योजनेचा उद्देश आहे, तसेच मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरतूद करणे, मुलींच्या लग्न कार्याच्या वेळेस पैशाची कमतरता भासू नये यासाठी शासनाकडून या योजनेच्या अंतर्गत बचत खात्यांवर जास्तीत जास्त व्याज दर दिला जातो, शासनाकडून नागरिकांसाठी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नियम अत्यंत सुलभ ठेवण्यात आले आहे कारण शासनाचा उद्देश आहे जास्तीत जास्त मोठ्याप्रमाणात नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना खाते मुलीच्या जन्मा पासून ते दहा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावाने तिचे पालक बचत खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत उघडले जाऊ शकते, केंद्र शासनाचा उद्देश आहे मुलींचे शिक्षण, मुलींचे आरोग्य आणि मुलींचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हि सुकन्या समृद्धी योजना एक उत्तम बचत योजना ठरण्यात यावी.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मिळणारे लाभ : sukanya samriddhi yojana scheme
केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचे नागरिकांना अनेक लाभ होत आहे, त्यापैकी महत्वपूर्ण लाभ खालीलप्रमाणे आहेत.
1} शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होते त्याचबरोबर मुलींचे भविष्य सुरक्षित होऊन तीला स्वावलंबी होण्यास मदत होते.
2} या योजनेंतर्गत खातेधारकांना ठेवीवर उत्तम व्याजदर देण्यात येतो.
3} हि बचत योजना शासनाची असल्यामुळे नागरिकांचे पैसे बुडण्याची शक्यता नाही आणि या योजनेत सरकारकडून नागरिकांच्या पैशाची हमी घेतल्या जाते.
4} हि योजना मुलींचे आरोग्य, मुलींचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि तिच्या सुरक्षित उज्ज्वल भविष्यासाठी हि शासनाची एक सर्वोत्तम योजना आहे, आणि देशातील प्रत्येक परिवारातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
5} सुकन्या समृद्धी योजनेचे बचत खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा भारतीय पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून देशभरात कुठेही उघडता येते, आणि या योजनेचा लाभ घेता येतो.
Sukanya Samriddhi Yojana
6} या योजनेचा फायदा म्हणजे या योजनेचा परिपक्वतेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरीही खातेधारकांना यामध्ये फक्त 14 वर्षा पर्यंत पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर जमा असलेल्या रकमेवर उर्वरित कालावधीत व्याज जमा होत राहते.
7} सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जमा करण्यात येणारी रक्कम आणि बचत खात्यात जमा असलेली रक्कम यावर आयकर नियमानुसार धारा 80C च्या अंतर्गत सूट प्राप्त आहे.
8} या योजनेंतर्गत पालक किंवा संरक्षक पालक आपल्या परिवारातील दोन मुलींच्या नावाने बचत खाते उघडू शकतात तसेच जुळ्या मुली झाल्यास तसे प्रमाण देऊन तीन मुलींच्या नावाने बचत खाते उघडू शकतात.
9} सुकन्या समृद्धी योजना (SSY) एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, आणि मुख्य म्हणजे हि बचत योजना खातेदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ देते, त्यामुळे खातेधारकांनी या योजनेमध्ये कमी गुंतवणूक केली तरीही त्यांना दीर्घकाळात उत्तम परतावा मिळतो.
10} योजनेंतर्गत जर मुलगी 18 वर्ष वयाची झाल्यावर किंवा इयत्ता 10 वी पास उत्तीर्ण असेल तर तिच्या पुढील शिक्षणासाठी बचत खात्यातून 50 टाके रक्कम काढता येईल, या योजनेंतर्गत पैसे एकत्रित मिळू शकतात किंवा हप्त्याने सुद्धा मिळू शकतात, पैसे वर्षातून एकदाच आणि जास्तीत जास्त पाच वर्षासाठी हप्त्यांमध्ये घेता येतात.
11} या योजनेंतर्गत खातेधारक मुलीचा जर दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, पालक किंवा कायदेशीर पालक बचत खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतात. हि रक्कम नॉमिनी व्यक्तीच्या खात्यात त्वरित जमा केली जाईल, यासाठी पालकांना किंवा कायदेशीर पालकांना खातेधारकाच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील ज्याची संबंधित अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जाईल.
12} सुकन्या समृद्धी योजना या योजनेंतर्गत खातेधारक मुलगी 18 वर्षे वयाची पूर्ण झाल्यावर तिचे बचत खाते व्यवस्थापित करू शकते, यामध्ये खातेधारक मुलीला, तिचे खाते असेलेल्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर मुलगी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते व्यवस्थापित करू शकते.
सुकन्या समृद्धी योजना वैशिष्ट्ये : Sukanya Samriddhi Yojana 2024
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर तिचे आई-वडील तिच्या आरोग्यासाठी तिच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी येणाऱ्या खर्च यासाठी पैसे जमा करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- Sukanya Samriddhi Yojana मध्ये मुलीचे आई-वडील दरमहा त्यांच्या सोयीनुसार योग्य ती रक्कम ठरवून खात्यामध्ये जमा करू शकतात.
- या योजनेअंतर्गत मुलीचे बचत खाते चालू करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक ही 250 रुपये आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.
- मुलीच्या जन्मापासून खाते सुरू केल्यास 16 वर्ष नियमितपणे ठरवलेली रक्कम भरून 21 व्या वर्षी एकूण जमा रकमेवर चक्रवाढ व्याजासहित चांगला परतावा मिळतो. तिच्या जन्मापासून ते 16 वर्ष पैसे नियमित भरायचे आहेत. त्यानंतर 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत (पुढील 5 वर्ष) कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे : sukanya samriddhi yojana benefits
- कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
- वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
- या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहेत.
- सध्या , सुकन्या समृद्धी योजनेचे(SSY) अनेक कर (Tax) लाभ आहेत.
- लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचे आहे. (७.६% इतके)
- जमा केलेली मुद्दल, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहेत.
- हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते.
- मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
- मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
- खाते चालू केल्यानंतर फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता आणि अटी :
- मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे.
- मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
- एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते उघडले जाऊ शकते, परंतु जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसुती वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तसेच पहिल्या प्रसूती वेळेस जर तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल तर अशा परिस्थितीत त्या तीनही मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या जन्म प्रमाणपत्रासह पालकांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यास उघडता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते बदलविण्याची प्रक्रिया : sukanya samriddhi yojana details
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत तुम्ही जर तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल आणि काही कारणास्तव तुम्ही दुसऱ्या शहरात शिफ्ट होत असाल, तर तुम्ही मुलीच्या नावाचे सुकन्या समृद्धी खाते सहजपणे ट्रान्सफर करू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल, आणि तुम्ही जिथे जात असाल तिथे जवळपास कोणतेही पोस्ट ऑफिस नसेल तर तुम्ही ते बचत खाते बँकेतही ट्रान्सफर करू शकता. तसेच तुमचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही एका बँकेत असल्यास, तुम्ही सुकन्या समृद्धी खाते नवीन ठिकाणी इतर कोणत्याही बँकेत ट्रान्सफर करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाचे सुकन्या समृद्धी खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करायचे असल्यास, खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल.
- यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सुकन्या समृद्धी खाते ट्रान्सफर करण्याची विनंती करणारा फार्म भरावा लागेल, ट्रान्सफर विनंती फॉर्मसाठी तुम्हाला बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल, जिथे बचत खाते उघडले आहे, त्यानंतर ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते ट्रान्सफर केले जाणार आहे त्या बँकेचे नाव आणि पत्ता अर्जावर नमुद करणे आवश्यक आहे.
- त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे सुकन्या समृद्धी खाते असलेल्या बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल आणि ट्रान्सफर विनंती फॉर्म आणि बचत खाते पासबुक सबमिट करावे लागेल, SSY खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी, मूळ पासबुक आणि ट्रान्सफर विनंती फॉर्म सबमिट करणे अनिवार्य आहे.
- यानंतर ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सध्या सुकन्या समृद्धी खाते आहे ते सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करेल, आणि विद्यमान सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करून ट्रान्सफर विनंतीवर प्रक्रिया केली जाईल. सुकन्या समृद्धी खात्याशी संबंधित सर्व कागदपत्रे खातेधारकाला दिली जातील. कागदपत्रे नवीन बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करणे आवश्यक आहे.
- त्यानंतरची स्टेप म्हणजे नवीन पोस्ट ऑफिस किंवा बँकेला भेट देणे आणि कागदपत्रे जमा करणे, सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि बचत खाते ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकाने KYC कागदपत्रे, फोटो आणि नमुना स्वाक्षरी सादर करणे आवश्यक आहे.
- यानंतर तुम्हाला नवीन बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून एक पासबुक दिल्या जाईल ज्यामध्ये तुमच्या बचत खात्याची जमा धनराशी दिसेल. अशा प्रकारे तुमचे सुकन्या समृद्धी योजना खाते ट्रान्सफर होईल आणि नंतर तुम्ही खात्याचे संचालन करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना खाते पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया :
अनेकवेळा पालक सुकन्या समृद्धी योजना खाते मुलीच्या नावाने उघडतात आणि काही आर्थिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्या खात्यात पैसे टाकायला विसरतात, अशावेळी हे सुकन्या समृद्धी खाते निष्क्रिय होते, परंतु आता याबद्दल काळजी करायची आवश्यकता नाही, सुकन्या समृद्धी खाते सहजपणे पुन्हा सक्रीय केले जाऊ शकते, सुकन्या समृद्धी योजना हि सरकारची मुलींसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे. यामध्ये बचत खाते उघडण्यासाठी फक्त 250/- रुपये लागतात. हे खाते सक्रीय ठेवण्यासाठी दरवर्षी किमान एवढी रक्कम जमा करावी लागते, योजनेच्या नियमानुसार जर हि रक्कम जमा केली नाही तर ते खाते डिफॉल्ट समजल्या जाते, अशा परिस्थितीत हे खाते निष्क्रिय होते. ते खाते पुन्हा सक्रीय करणे सोपे आहे त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.
- सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सुरु करण्यासाठी, तुम्हाला जिथे तुमचे सुकन्या समृद्धी खाते उघडले आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत जावे लागेल, यानंतर तुम्हाला तुमचे बचत खाते पुन्हा सक्रीय करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर थकबाकीची रक्कम भरावी लागेल, म्हणजेच ज्यावर्षी तुम्ही पैसे भरले नाहीत, त्यासाठी किमान 250/- रुपये भरावे लागतील.
- यासाठी 250/- रुपये भरण्याबरोबरच दरवर्षीप्रमाणे 50/- रुपये दंड सुद्धा भरावा लागेल, समजा आपण असे समजू कि बचत खाते तीन वर्षापासून सक्रीय नाही, अशा परिस्थितीत 750/- रुपये आणि 150/- रुपये दंडासह तीन वर्षासाठी 900/- रुपये भरावे लागतील. अशा प्रकारे तुमचे सुकन्या समृद्धी बचत खाते पुन्हा सक्रीय केले जाईल.
- यामध्ये जुन्या नियमांनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी लागू असलेल्या दराने डिफॉल्ट खात्यांवर व्याज आकारले जात होते. नवीन नियमांनुसार सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सक्रीय न केल्यास, डिफॉल्ट खाते परीपक्वतेपर्यंत योजनेसाठी लागू असलेल्या दराने व्याज मिळवत राहील
- सुकन्या समृद्धी खात्याच्या तुलनेत पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याज दर खूपच कमी आहे. जिथे सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यांवर व्याजदर 4 टक्के आहे. आणि तसेच सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 7.6 टक्के व्याजदर मिळत आहे.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता :
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षापेक्षा अधिक नसावे, मोठया रकमेचा खर्च न करिता आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी हि योजना एक उत्तम पर्याय आहे.
- केवळ मुलीच सुकन्या समृद्धी बचत खाते उघडण्यास पात्र आहेत, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाते केवळ मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडतांना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे, मुलीच्या वयाचा पुरावा जोडावा लागेल.
- एका मुलीसाठी एकापेक्षा जास्त सुकन्या समृद्धी बचत खाते उघडता येत नाही, एक कुटुंबातील केवळ दोन सुकन्या समृद्धी खाते म्हणजेच प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडण्याची परवानगी आहे. यामध्ये समृद्धी बचत खाते काही विशेष प्रकरणांमध्ये उघडले जाऊ शकते.
- जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मापूर्वी एका मुलीचा जन्म झाला असेल किंवा तीन मुली आधी एकत्र जन्माला आली असेल तर अशा परिस्थितीत तिसरे खाते उघडता येते.
- यामध्ये जुळ्या किंवा तिप्पटांचा जन्मनंतर मुलीचा जन्म झाल्यास तिसरे SSY खाते उघडता येत नाही.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी खालील काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे
- मुलीच्या जन्माचा दाखला
- पालकांचे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी
- पत्त्याचा पुरावा यामध्ये रेशन कार्ड अथवा लाईट बिल
- सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म
सुकन्या समृद्धी योजनासाठी राष्ट्रीयकृत बँकांची यादी : Sukanya Samriddhi Yojana Bank List
सुकन्या समृद्धी योजना खाती उघडण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे अधिकृत एकूण 28 बँका आहेत. वापरकर्ते खालीलपैकी कोणत्याही बँकेत SSY खाते उघडू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- बँक ऑफ इंडिया (BOI)
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- बँक ऑफ महाराष्ट्र (BOM)
- अॅक्सिस बँक
- अलाहाबाद बँक
- आंध्र बँक
- कॉर्पोरेशन बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)
- कॅनरा बँक
- देना बँक
- बँक ऑफ बडोदा (BOB)
- स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP)
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर (SBM)
- इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)
- इंडियन बँक
- पंजाब नॅशनल बँक (PNB)
- IDBI बँक
- आयसीआयसीआय बँक
- सिंडिकेट बँक
- स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर (SBBJ)
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT)
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC)
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH)
- पंजाब आणि सिंध बँक (PSB)
- युनियन बँक ऑफ इंडिया
- युको बँक
- युनायटेड बँक ऑफ इंडिया
- विजय बँक
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर : sukanya samriddhi yojana interest rate
Sukanya Samriddhi Yojana मध्ये मिळणारा व्याजदर हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदलांवर वर-खाली होत असतो. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर केंद्र सरकार ठरवते. 2015 मध्ये या योजनेचा व्याजदर 9.1% इतका होता. 2022-23 च्या भारतीय अर्थव्यवस्थेनुसार या वर्षातील व्याजदर हा 7.6% इतका होता. आणि आत्ताच्या 2023-24 च्या आर्थिक वर्षात या योजनेचा व्याजदर 8% करण्यात आला आहे. व्याजदर एक एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आला.
मागील काही वर्षातील व्याजदर तक्ता
कालावधी | व्याजदर |
---|---|
एप्रिल-जून 2020 | 7.6% |
जानेवारी-मार्च 2020 | 8.4% |
जुलै-सप्टेंबर 2019 | 8.4% |
एप्रिल-जून 2019 | 8.5% |
जानेवारी-मार्च 2019 | 8.5% |
ऑक्टोंबर-डिसेंबर 2018 | 8.5% |
जुलै-सप्टेंबर 2018 | 8.1% |
एप्रिल-जून 2018 | 8.1% |
जानेवारी-मार्च 2018 | 8.1% |
ऑक्टोंबर-डिसेंबर 2017 | 8.3% |
जुलै-सप्टेंबर 2017 | 8.3% |
एप्रिल-जून 2017 | 8.4% |
सुकन्या समृद्धी योजनेचा हाच फायदा आहे, की इतर बचत योजनांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त व्याजदर मिळते. नक्कीच मुलींच्या भवितव्यासाठी या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास योग्य वेळी त्याचा फायदा होऊ शकतो.
सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर : sukanya samriddhi yojana calculator
कॅल्क्युलेटर तुम्ही भरलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला मॅच्यूरीटीच्या वेळी मिळणाऱ्या रकमेची अंदाजे गणना करते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षे पूर्ण झाल्यावर योजना परिपक्व होईल.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत योजनेच्या नियमांनुसार खाते उघडण्याच्या तारेखेपासून 14 वर्ष होईपर्यंत ठेवीदारांनी या बचत खात्यात गुंतवणूक करणे आवश्यक आहे, या ठिकाणी कॅल्क्युलेटर असे गृहीत धरतो कि तुम्ही निवडलेली रक्कम दरवर्षीप्रमाणे बचत खात्यात गुंतवणूक केली आहे.
या योजनेमध्ये 14 व्या वर्षी 21 व्या वर्षाच्या दरम्यान, या बचत खात्यात कोणतीही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही, कारण त्या पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळेल. कॅल्क्युलेटर त्या वर्षांमध्ये तुम्हाला मिळणारे व्याज विचारात घेतो.
यामध्ये तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर, कॅल्क्युलेटर तुम्हाला बचत खाते कोणत्या वर्षात परिपक्व होते, मॅच्यूरीटी व्हॅल्यू, व्याजदर दाखवेल ज्याचा वापर करून मॅच्यूरीटी व्हॅल्यू निघाली आहे. तुम्ही या योजनेत मासिक गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेच्या रिटर्न्सची कॅल्क्युलेट
Deposit / Year | Interest Rate @7.6 (Approx.) | Closing Balance (Approx.) |
---|---|---|
Rs. 50,000 | Rs. 3,800 | Rs. 53,800 |
Rs. 50,000 | Rs. 7,889 | Rs. 1,11,689 |
Rs. 50,000 | Rs. 12,288 | Rs. 1,73,977 |
Rs. 50,000 | Rs. 17,022 | Rs. 2,40,999 |
Rs. 50,000 | Rs. 22,116 | Rs. 3,13,115 |
Rs. 50,000 | Rs. 27,597 | Rs. 3,90,712 |
Rs. 50,000 | Rs. 33,494 | Rs. 4,74,206 |
Rs. 50,000 | Rs. 39,840 | Rs. 5,64,046 |
Rs. 50,000 | Rs. 46,667 | Rs. 6,60,713 |
Rs50,000 | Rs. 54,014 | Rs. 7,64,728 |
Rs. 50,000 | Rs. 61,919 | Rs. 8,76,647 |
Rs. 50,000 | Rs. 70,425 | Rs. 9,97,072 |
Rs. 50,000 | Rs. 79,577 | Rs. 11,26,650 |
Rs. 50,000 | Rs. 89,425 | Rs. 12,66,075 |
Rs 0 | Rs. 96,222 | Rs. 13,62,297 |
Rs. 0 | Rs. 1,03,535 | Rs. 14,65,831 |
Rs. 0 | Rs. 1,11,403 | Rs. 15,77,234 |
Rs. 0 | Rs. 1,19,870 | Rs. 16,97,104 |
Rs. 0 | Rs. 1,28,980 | Rs. 18,26,084 |
Rs. 0 | Rs. 1,38,782 | Rs. 19,64,867 |
Rs. 0 | Rs. 1,49,330 | Rs. 21,14,196 |
4 वर्षासाठी 50,000/- रुपयाच्या वार्षिक ठेवींच्या आधारावर, सुकन्या समृद्धी मिळालेले व्याज 14,14,196/- रुपये आणि 21,14,196/- रुपये याप्रमाणे परिपक्वता धनराशी मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :
सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्याही सहभागी बँक अथवा पोस्ट ऑफिस शाखेमध्ये उघडले जाऊ शकते त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करा.
- तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी जा.
- तिथून सुकन्या समृद्धी योजना चा फॉर्म घ्या आणि आवश्यक माहिती सह फॉर्म भरा आणि सोबत लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा.
- कागदपत्रे आणि फॉर्म जमा केल्यानंतर बँकेकडून कागदपत्रांची तपासणी केली जाईल
- कमीत कमी २६० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पण पण दीड लाखाच्या आत, इतके रक्कम तुम्ही भरणार असाल ती फॉर्म मध्ये आणि स्लिप वर लिहा.
- तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती दिली जाईल व तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू केले जाईल.
- या खात्यासाठी तुम्हाला एक पासबुक सुद्धा दिले जाईल.खातेदारास त्या अकाउंट नंबर वर 15 वर्षांपर्यंत पैसे जमा करावे लागणार आहेत.
sukanya samriddhi yojana details
सुकन्या समृद्धी योजना PDF Download :
सुकन्या समृद्धी योजनेची माहिती PDF स्वरूपात Download करू शकता. ही योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही अधिकृत बँकेमध्ये व पोस्ट ऑफिसमध्ये खालील फॉर्म उपलब्ध असतात ते तुम्ही माहितीसाठी इथून Download करून प्रिंट देखील काढू शकता.
अधिकृत वेबसाईट | 👉येथे क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजना (SSY) फॉर्म | 👉येथे क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस मधला फॉर्म (SSY Post Office Form) | 👉येथे क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेची माहिती PDF | 👉येथे क्लिक करा |
sbi sukanya samriddhi yojana account opening form online | 👉येथे क्लिक करा |
धन्यवाद ! 🙏
सारांश,
नमस्कार मित्रांनो तुम्हाला ही सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी अन्य काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न नक्की करू.
Sukanya Samriddhi Yojana 2024 FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१) सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय किती असावे?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे.
२) सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी किती पैसे भरता येतात?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी २५० रुपये भरता येतात.
३) सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त किती पैसे भरता येतात?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात.
४) सुकन्या समृद्धी खाते कोण उघडू शकतो?
उत्तर – मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात.
५) अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
उत्तर – अजून पर्यंत या विषयाबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा आलेली नाही, त्यामुळे अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
६) खातेधारकाचा मृत्यू झालास काय होते?
उत्तर – खातेधारक मुलीचा मृत्यू झाला असे खाते बंद केले जाते आणि तिच्या पालकांना देय रक्कम दिली जाते.
७) खातेधारकाच्या पालकांचा मृत्यू झाल्यास काय होते?
उत्तर – खातेधारक मुलीच्या पालकांचा मृत्यू झाल्यास, ही योजना एक तर बंद केली जाते आणि मिळणारी रक्कम कुटुंबाला दिली जाते. किंवा ही योजना मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जमा केलेल्या रकमेसह चालू ठेवली जाते आणि मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळत राहते नंतर त्या मुलीला सर्व रक्कम दिली जाते.
८) मी माझे बचत खाते सुकन्या समृद्धी योजना खात्यात रूपांतरित करू शकतो का?
उत्तर – नाही, सध्या अशा प्रकारची कोणतीही सुविधा नाही सुकन्या समृद्धी योजना हे एक स्वतंत्र खाते आहे.
९) मी माझ्या सुकन्या समृद्धी खात्यातून मॅच्युरिटी आधी पैसे काढू शकते का?
उत्तर – नाही परंतु मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तिच्या शैक्षणिक खर्चासाठी पैशांची आवश्यकता असेल तर अशावेळी मात्र ५०% रक्कम काढता येते.
१०) सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण भारतात चालू आहे का?
उत्तर – होय, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने ती भारतातील प्रत्येक राज्यात चालू आहे.
११) मी माझ्या मुलीसाठी एकूण किती खाते उघडू शकतो?
उत्तर – एका मुलीसाठी फक्त एकच सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याची परवानगी आहे.
१२) मी माझ्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते कुठे उघडू शकतो?
उत्तर – सुकन्या समृद्धी खाते तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकांमध्ये उघडू शकता उदाहरणार्थ- एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक, इत्यादी.
१३) सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर फिक्स आहे का?
उत्तर – नाही, केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेनुसार या योजनेचा व्याजदराचा अभ्यास करून दर तिमाहित सुधारणा करत असते.
१४) सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येतो?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे जन्मापासून १० वर्षांपर्यंत खाते उघडता येते.